माजी केंद्रीय गृहमंत्री चाकुरकर यांची कांग्रेस प्रवक्ते कोडगिरे यांच्या घरी सदीच्छा भेट
शोषण विरहित समाज निर्माण होण्याची गरज – माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देशाचे माजी गृहमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर यांनी मुखेड शहरातील काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगिरे यांच्या घरी सदीच्छा भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, काँग्रेस नंदकुमार मडगूलवार, दत्तात्रय चौधरी, शिवसेना उपतालूका प्रमुख शरद कोडगिरे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रियाज शेख, सचीन देबडवार, ऊत्तम कोडगिरे, श्रीनीवास कोडगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदिच्छा भेटी दरम्यान मुखेड शहर व तालुक्यातील भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रश्नांसह विविध विषयावर चर्चा झाली.
जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकुरकर साहेबांच्या प्रगल्भ विचारांनी सारे प्रभावीत झाले. आधी शेतकरी जगला पाहीजे शेतकर्यांनी शेतमजूरांना योग्य मोबदला दिला पाहीजे, व्यापार्यांनी शेतीमालाला रास्त किंमत मिळवून दिली पाहिजे, ऊद्योगांनी व्यापार्यांनी खरेदी केलेल्या शेतमालावर प्रक्रीया करणारे प्रकल्प ऊभारुन लाभ मिळवून दिला पाहीजे अन् सरते शेवटी शासनाने ऊद्योगासाठी योग्य वातावरण निर्माण करून ते जगवले पाहीजे विकसीत केले पाहीजे अशी ही समाज व्यवस्थेची साखळी गूंफली जाते यामध्ये कोणीही कोणत्याही वर्गाचे शोषन करु नये, शोषण विरहित समाज हीच आदर्श व्यवस्था असून सर्वांनी मानवीय उदात्त भावनेने एकमेकांना सावरले पाहीजे. पक्षीय मतभेद विचारांचे असू शकतात मनभेद असू नयेत. तसेच मुखेडच्या लेडीं प्रकल्पाची, बोधन- मुखेड – लातुर रोड रेल्वे मार्गाची चर्चा झाली. चाकुरकरांनी योग्य व्यासपीठावर ते मांडू तसेच या भागातील लोक प्रतिनीधींनी संबधीतांकडे पाठपुरावा जरुर करावा नक्कीच हे प्रकल्प पूर्ण होईल असा आशावाद ही व्यक्त केला.
लातुर जिल्ह्यातील उदगीर येथील लाईफ केअर हाॅस्पीटल च्या सर्वेसर्वा डाॅ.सौ.अर्चनाताई शैलेश पाटील चाकुरकर यांनी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शेख रियाजशी चर्चा करताना सांगितले कि, आपल्या परीसरातील कर्करोग व नेत्रदोष असलेल्या रुग्णांसाठी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, शिबिरासाठी तज्ञ डाॅक्टरांसह संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत येणारी शस्रक्रिया लाईफ केअर मध्ये करण्याचे अभिवचन दिले. डाॅ.सौ.अर्चनाताईंच्या माध्यमातून शिबिराचा गरजू रुग्णांना नक्कीच फायदा होईल.
यावेळी शिवराज पाटील चाकुरकर, शैलेश पाटील चाकुरकर, यांचा नगराध्यश देबडवार, दिलीप कोडगिरे यांनी शाल, पुष्पगूच्छ देवून सत्कार केला,. तसेच डाॅ.सौ.अर्चनाताई शैलेश पाटील, अॅड.रुद्राली शैलेश पाटील यांची सौ.वर्षा कोडगिरे यांनी साडीचोळी ने औटी भरुन सन्मान केला. तसेच प्रा.मोतीपवळे, गुलाब किशनराव पाटील यांचाही कोडगिरे परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवराज पाटील चाकुरकर यांची मुखेडला दिलेली धावती भेट उपस्थितांसाठी संस्मरणिय ठरली आहे.