Home Breaking News सटाणा येथील तहसील व पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेल्या झाडांसाठी नवे निरपुर सरपंच...

सटाणा येथील तहसील व पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेल्या झाडांसाठी नवे निरपुर सरपंच शरद( मुन्ना दादा )सूर्यवंशी यांनी स्वखर्चाने सिंचनाची व्यवस्था केली.

251
0

सटाणा – शशिकांत पवार (युवा मराठा न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी सटाणा  ) सटाणा येथील तहसील व पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेल्या झाडांसाठी नवे निरपुर सरपंच शरद( मुन्ना दादा )सूर्यवंशी यांनी स्वखर्चाने सिंचनाची व्यवस्था केली. पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाच्या आवारात बोरवेल केला होता परंतु या बोरवेल मध्ये
मोटार व पाईप, स्टार्टर वायर नसल्यामुळे झाडांना पाणी देण्याची अडचण होत होती ही गोष्ट नवे निरपुर चे सरपंच मुन्ना सूर्यवंशी हे कामानिमित्त तहसील कार्यालयात गेले असता त्यांना समजले त्याबाबत त्यांनी तहसीलदार जितेंद्र इंगळे व पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड साहेब यांना सांगितले की मी या झाडांसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी मोटर व सर्व संच देऊ इच्छितो त्याला या दोघी अधिकाऱ्यांनी होकार दिला आणि मुन्ना सूर्यवंशी यांनी स्वखर्चाने बोअरवेल साठी मोटर , पाईप, व वयार सह सर्व संच देऊन जलसिंचनाची व्यवस्था करून दिली. या अभिनव प्रकल्पाचे उद्घाटन सटाणा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी केले तसेच याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे साहेब, पोलीस उपनिरीक्षक बहिरम साहेब ,सोनवणे साहेब आदी उपस्थित होते.
असे चांगले उपक्रम हाती घेऊन मुन्ना सूर्यवंशी यांनी एक चांगला आदर्श युवा पिढी समोर ठेवला आहे ह्या बोरवेल मध्ये मोटर टाकल्यामुळे तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन आवारात तालुका भरातून येणाऱ्या नागरिकांची व येथील कर्मचाऱ्यांची देखील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय होणार आहे त्याबाबत गायकवाड साहेबांनी मुन्ना सुर्यवंशी यांचे कौतुक केले.
याप्रसंगी सोनवणे तात्या , विकी दादा सोनवणे ,सचिन सूर्यवंशी ,गोरख चव्हाण, अमोल सूर्यवंशी, नंदू सूर्यवंशी, नंदू सूर्यवंशी, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.

Previous articleपवनचक्की प्रकल्प अधिकारी गाव पुढारी तुपाशी शेतकरी माञ उपाशी
Next articleदेवळा येथे पोलिस मित्र समीती देवळा यांचा विविध कार्यक्रम आयोजीत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here