Home माझं गाव माझं गा-हाणं बागलाण तालुक्यातील शेतकऱ्याने फुलविली सफरचंद बाग         

बागलाण तालुक्यातील शेतकऱ्याने फुलविली सफरचंद बाग         

301
0

राजेंद्र पाटील राऊत

बागलाण तालुक्यातील शेतकऱ्याने फुलविली सफरचंद बाग                                          सटाणा,(शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) बागलाण तालुक्यातील परंपरागत शेती पिकांना फाटा देत आखतवाडे येथील शेतकरी पंडित नेवबा ह्याळीज यांनी त्यांच्या शेतात सफरचंदाची शेती पिकवली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . बागलाण तालुक्यात विशेषकरून मोसम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब व द्राक्ष याचे उत्पादन घेतले जातात या दोन पिकांसाठी हा परिसर प्रसिद्ध असून या परिसरातून एक्सपोर्ट प्रतीचे डाळिंब व द्राक्षे पिकवली जातात परंतु डाळिंबावरील मर व तेल्या रोगापासून शेतकरी हैरान होऊन अनेक शेकऱ्यांनी आपल्या शेतातील निराशे पोटी डाळिंबाच्या बागा उपटून टाकल्या व कांदा , मका सारखी पिके घेतली परंतु या परंपरागत पिकांसोबत नवीन काहीतरी करण्याची उमेद असलेले प्रयोगशील शेतकरी पंडित ह्याळीज यांनी आपल्या शेतात सफरचंद ची शेती करून उत्कृष्टपणे चांगल्या प्रतीची सफरचंदचे पिक घेतले आहे .त्यामुळे बागलाण तालुक्यात हा सध्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. त्यांच्या या प्रयत्नांनी अनेक शेतकऱ्यांनी प्रेरणा घेत आपल्या शेतात देखील बरोबर सफरचंदाचे पीक घेण्याची तयारी दाखवली आहे .काश्मीर, हिमाचल प्रदेश मध्ये सफरचंदाचीशेती केली जाते परंतु आम्ही बागलान कर देखील ही शेती करून उत्कृष्ट प्रतीचे सफरचंद पिक काढू शकतो हाच संदेश कदाचित या प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून बागलान चे शेतकरी देत आहेत असेच म्हणावे लागेल.

” _माझी डाळींबाची मोठी बाग होती पण सलग तीन ते चार वर्षापासून ऐन फळ काढणीच्या वेळेसच तेल्या रोगांमुळे व मर मुळे सगळ पिक हातून जातं असे अक्षरशः उकिरड्यावर फेकुं द्यावे लागत होते त्याला वैतागून ही आगळी वेगळी
शेती केली आणि त्यात यश मिळाल्याचे समाधान आहे व सर्व शेतकरी बांधवांनी ही शेती करावी ”

पंडित नेवबा ह्याळीज _,प्रयोगशील शेतकरी, आखतवाडे_

Previous articleधैर्य सामाजिक संस्थामार्फत नानेघोळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप 🛑
Next articleअंगणवाडी सेविकांना इंग्रजीमध्ये माहिती भरण्यासाठी सक्ती             
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here