Home माझं गाव माझं गा-हाणं अंगणवाडी सेविकांना इंग्रजीमध्ये माहिती भरण्यासाठी सक्ती             

अंगणवाडी सेविकांना इंग्रजीमध्ये माहिती भरण्यासाठी सक्ती             

284
0

राजेंद्र पाटील राऊत

अंगणवाडी सेविकांना इंग्रजीमध्ये माहिती भरण्यासाठी सक्ती                                        सटाणा — (शशिकांत पवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प च्या अंगणवाडी ची संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये भरण्याच्या अजब फतव्याने अंगणवाडी सेविकांची तारांबळ होत असून त्रेधा तिरपीट होतआहे. इंग्रजी मध्ये माहिती भरण्याची सक्ती बंद करून प्रचलित पद्धत मराठी मध्ये माहिती भरण्याची सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र शासनाने सर्व आस्थापना मराठी मध्ये करावेत अशा सूचना असताना व केंद्र सरकार दरबारी देखील मराठी भाषा आस्थापने ला प्राधान्य असतानादेखील अशी सक्ती का ?
अंगणवाडी हा प्रत्येकाचा शिक्षणाचा पाया असून येथूनच शिक्षणाची सुरुवात होते. अंगणवाडीमध्ये किशोरवयीन मुली ,गरोदर माता, स्तनदा माता तसेच ० ते ६ वर्ष वयोगट पर्यंतचे बालकांचे सर्वेक्षण ,त्यांची माहिती व देखभाल ,त्यांना दिला जाणारा पोषण आहार, त्यांच्या आरोग्याची काळजी व त्याचबरोबर शिक्षण त्यांना देत असलेल्या लसी बरोबरच त्या अंगणवाडीच्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांची माहिती, त्या परिसरातील जन्मदर व मृत्युदर या सर्वांची सखोल माहिती या अंगणवाडी कार्यकर्ती कडे असते . पोलिओ लसीकरण असो की मग आत्ता आलेली कोरोना सारखी महामारी त्या सर्वांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण व माहिती संकलनचे काम या या अंगणवाडी सेविका करतात.
या अंगणवाडी सेविका पैकी अनेक सेविका ह्या काही वर्षात सेवानिवृत्त होतील पैकी त्यांचे त्यावेळचे शिक्षण देखील कमी आहे बऱ्याच जणींना इंग्रजी चे पुरेसे ज्ञान नाही . त्यावेळी परिस्थिती तशी होती त्यामुळे त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नसणे स्वाभाविकच आहे परंतु जिल्हा परिषद ने वरील सर्व माहिती हि आपल्या मोबाईल ॲप मध्ये इंग्रजीत भरणे सक्तीचे केले आहे , ही माहिती भरताना अंगणवाडी सेविकांची तारांबळ उडत असून त्रेधातिरपिट होत आहे परंतु “मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार “या म्हणीप्रमाणे आपली मुस्कटदाबी सहन करीत सदरील अंगणवाडी कर्मचारी ह्या सत्तेच्या फतव्याला वैतागल्याअसून सदरील माहिती भरताना खूप अडचणी येत आहेत त्यासाठी त्यांना इतर कोणा कडून माहिती भरून घ्यावी लागते . जर या माहितीत काही चूक भूल झाली तर याला जबाबदार कोण ? असा देखील प्रश्न त्यांच्या मनात घोंगावत आहे. दुसरीकडे एक मुख्य सेविका यांच्याकडे किमान २०ते २५ अंगणवाड्यांचा कारभार आहे त्यामुळे त्यांना देखील हे काम शक्य नाही.
तालुकास्तरावर असलेल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, सांख्यिकीअधिकारी अशी कारकून मंडळी असताना देखील कमी शिक्षित असलेल्या अंगणवाडी सेविकांना या माहितीबाबत सक्ती का केली जाते असा सवाल होत आहे.तर तालुका कार्यालयामध्ये बसलेली मंडळी फक्त वरिष्ठांचे कान फुकण्याचेच काम करतात अशी कुजबूज ऐकायला मिळत आहे.
अंगणवाडी सेविकांना अत्यल्प मानधन दिले जाते अत्यल्प मानधनात त्यांच्याकडून अनेक कामे करून देखील त्यांच्यावर अशी हिटलरशाही राबवली जात आहे तरी इंग्रजीमध्ये माहिती भरण्याची सक्ती रद्द करून पूर्वीप्रमाणे प्रचलित असलेली मराठीमध्ये माहिती भरण्याची पद्धत सुरू ठेवावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

Previous articleबागलाण तालुक्यातील शेतकऱ्याने फुलविली सफरचंद बाग         
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या २२ व्या वर्धापनदिनी सिलिंडर वितरण कर्मचार्‍यांचा सत्कार 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here