Home नांदेड लोहा तालुक्यात संत बाळुमामाच्या भंडाऱ्यात विषबाधा ; तर रूग्णांवर तातडीने उपचार चालु

लोहा तालुक्यात संत बाळुमामाच्या भंडाऱ्यात विषबाधा ; तर रूग्णांवर तातडीने उपचार चालु

111
0

आशाताई बच्छाव

IMG_20240207_121903.jpg

लोहा तालुक्यात संत बाळुमामाच्या भंडाऱ्यात विषबाधा ; तर रूग्णांवर तातडीने उपचार चालु

लोहा प्रतिनिधि अंबादास पाटील पवार 

लोहा तालुक्यातील कोष्टवाडी परीसरात संत बाळुमामा यांच्या पालखी सोहळ्यात आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर भंडारा प्रसादात काल एकादशी असल्यामुळे भाविकांना भगर हा महाप्रसाद करण्यात आला होता या महाप्रसादात विषबाधा झाल्यामुळे सावरगाव , कोष्टवाडी, हरणवाडी , पेंडु , सादलापुर , सह परीसरात अन्य गावातील व्यक्तींना तो भंडाऱ्याचा महाप्रसाद सेवन केल्याने विषबाधा झाली असुन यामध्ये 2 ते 2.50 हजार लोकांचा समावेश असुन सदरील पेशन्टला शासकीय रुग्णालय लोहा तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एस टी बस सह अन्य खाजगी वाहनांने काही पेशन्टला शासकीय रुग्णालय नांदेड , अहमदपूर येथे दाखल करण्यात आले आहे. सर्वांना उपचार प्रकिया चालु असुन पोलिस निरीक्षक अधिक्षक , नायब तहसीलदार , असंख्य अधिकारी व कर्मचारी यांचे अथक प्रयत्न चालू आहेत.

सर्व रूग्णांना उपचार चालू आहे , वाहने पण उपलब्ध आहेत, सरकारी दवाखान्यासह औषध पुरवठा पण उपलब्ध आहे सध्या शांतता आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही अशी माहिती लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली आहे.

Previous articleधान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना लुटले : लुटारुंवर फौजदारी गुन्हे दाखल करा
Next articleदेशहितवादी’ ग्रंथाचे प्रकाशन करण्याचा आनंद अद्वितीय स्वरूपाचा आहे- आमदार बाळासाहेब थोरात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here