Home मुंबई मराठा आरक्षणाच्या दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मुंबईत आंदोलन 🛑

मराठा आरक्षणाच्या दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मुंबईत आंदोलन 🛑

87
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 मराठा आरक्षणाच्या दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मुंबईत आंदोलन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕तीस वर्षाच्या लढ्यानंतर साठ मोर्चे अनेक आंदोलने उपोषणे बेचाळीस बांधवांच्या बलिदानानंतर मराठ्यांना मिळालेला आंदोलन महा विकास आघाडीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले .

हे सरकार मराठा आरक्षणाची आणि गायकवाड आयोगाने दिलेल्या आरक्षण अहवालाची बाजू सुप्रीम कोर्टात मांडण्यासाठी असमर्थ ठरले यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्री राजन घाग व इतर सर्व समन्वयकांनी भारत माता लालबाग येथे सरकारचा निषेध केला.

हे आरक्षण जाण्यासाठी मराठा आरक्षण उपसमिती आणि अशोक चव्हाण जबाबदार आहेत त्यामुळे अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व मराठा आरक्षण उपसमितीची पुनर्रचना करण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आली.

त्याचप्रमाणे येणार्‍या शैक्षणिक वर्षात आरक्षण नसतानासुद्धा मराठा समाजातील मुलांना शिक्षणात व नोकरीमध्ये संधी देता येतात त्या तशा सरकारने द्यावा यासाठी ही सरकारला आवाहन करण्यात आले.

जर मराठा समाजाला आरक्षणाचे लाभ मिळाले नाही तर मुंबई मध्ये मोठ आंदोलन करून मुंबई ठप्प करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी श्री राजा विचारे, श्री नामदेव पवार, श्री सुनील पोळ ,श्री विजय पवार, श्री भागवत पानसरे, श्री योगेश उपडे व अन्य समन्वयक उपस्थित होते.⭕

Previous articleमराठा आरक्षण रद्दला राज्य आणि केंद्रसरकारच जबाबदार , जिल्हाअध्यक्ष मोहन शिंदे
Next articleमराठा आरक्षणाचा कायदा’, कराचा मुख्यमंत्री ठाकरेची पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here