• Home
  • देगलूर येथे भाजपा च्या वतिने महा.वि.अ.च्या विरोधात रास्तारोको आंदोलन, व निवेदन देण्यात आले –

देगलूर येथे भाजपा च्या वतिने महा.वि.अ.च्या विरोधात रास्तारोको आंदोलन, व निवेदन देण्यात आले –

देगलूर येथे भाजपा च्या वतिने महा.वि.अ.च्या विरोधात रास्तारोको आंदोलन, व निवेदन देण्यात आले –

नांदेड, दि.१ ; राजेश एन भांगे

भारतीय जनता पार्टी देगलूर शहर व तालुक्याच्या वतीने दि. १- आॕगस्ट रोजी शनिवारी सकाळी १० वा. सुमारास देगलूर महाविद्यालय देगलूर, उदगीर रोड देगलूर येथे महाविकास आघाडीच्या सरकार च्या विरोधात शेतकऱ्यांच्या दुधास हे अघाडी शासन कवडी मोल भाव देत आहे या विरोधात भारतीय जनता पार्टी देगलूर तर्फे.खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या आदेशानुसार व जिल्ह्याध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाध्यक्ष शिवाजी कंनकंटे व शहराध्यक्ष अशोक गंदपवार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथील उदगीर रोड वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या वेळी प्रकाश पाटील बेम्बरेकर (जिल्ह्या उपाध्यक्ष नांदेड), प्रशांत दासरवार(नगरसेवक तथा गटनेता न.प.देगलूर), मुन्ना पाबितवार, गंगाधर दौलवार , कृष्णा जोशी, दिगंबर कौरवार, अशोक डुकरे (तालुका सरचिटणीस), राजेंद्र मंडगिकर, तुकाराम कोकणे, सुभाष कदम , शिवाजी इंगळे, पुलचुवड सर, राजेंद्र पाटील, सोशल मीडियाचे सुरज मामीडवार, अर्जुन वनप्रतीवार, सौरव मधुरवार व अशोक कांबळे देगलूरकर आदि जन यावेळी उपस्थित होते.

आंदोलनातील प्रमुख_मागण्या.

१)दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाईंच्या दुधासाठी सरसकट प्रति लिटर १० रुपये अनुदान द्या.
२)दूध बुकटी निर्यातीला प्रति किलो ५० रुपये अनुदान द्या.
३)आघाडी सरकारने घोषित केलेल्या सरसकट कर्ज माफी करा.
४) लॉंकडाऊन काळातील लाईटबील माफ करावे
या मगणीचे निवेदन तहसिल आॕफिसला देण्यात आले.

anews Banner

Leave A Comment