Home Breaking News नगाव ग्रामसेवक प्रल्हाद खैरनारचा महाभयानक कारनामा…जानेवारीत मेलेली “भागाबाई” फेब्रुवारीत घेतेय रुग्णालयात उपचार! ...

नगाव ग्रामसेवक प्रल्हाद खैरनारचा महाभयानक कारनामा…जानेवारीत मेलेली “भागाबाई” फेब्रुवारीत घेतेय रुग्णालयात उपचार!                 

1533
0

राजेंद्र पाटील राऊत

20230607_195321-BlendCollage.jpg

नगाव ग्रामसेवक प्रल्हाद खैरनारचा महाभयानक कारनामा…जानेवारीत मेलेली “भागाबाई” फेब्रुवारीत घेतेय रुग्णालयात उपचार!                        मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत)शासकीय कामकाजाच्या त-हा या अजब गजबच असतात.सत्याला अडचणीत आणायचे अन लबाडाला पाठीशी घालून खोटे व लबाडीचे कामे कागदोपत्री करायची यात माहिर असलेल्या शासनातील कर्मचाऱ्यांनी “हम करे सो कायदा” या न्यायाने आता अक्षरशः कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळायचे बाकी ठेवले आहे.अगोदरच व-हाणे ग्रामपंचायतीच्या बोगस कारभाराची लक्तरे संपूर्ण महाराष्ट्रभर वेशीवर टांगली गेली आहेत.आणि दोषी ग्रामसेविका सुवर्णा सांळुखेला वाचविण्यासाठी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसह भुरटया पुढाऱ्यांचा आटापीटा सुरु असतानाच,आता नव्याने पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारे अजब गजब ग्रामसेवकाच्या कर्तृत्वाचे प्रकरण चव्हाटयावर आले आहे.नाशिक जिल्ह्यातील मालेगांव जवळील नगांव (दिगर) ग्रामपंचायतीचे (अ) कर्तबगार ग्रामसेवक प्रल्हाद खैरनार यांनी अफलातून महाभयानक कारनामा केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की,नगांव (दिगर) या गावी भागाबाई चिंतामण बागुल हि महिला आपल्या दोन मुलासह नामदेव व अशोक यांच्यासमवेत शेतशिवारात वास्तव्यास असताना,ग्रामसेवक प्रल्हाद खैरनार यांनी भागाबाईचा मुलगा नामदेव बागुल यांच्या संगनमताने भागाबाई चिंतामण बागुल हि २२ जानेवारी २०२३ रोजी मृत्यू पावल्याचा खोटा व बनावट दाखला केवळ नामदेवला शेतजमीन हडपता यावी म्हणून हे षडयंत्र रचले.प्रत्यक्षात भागाबाई चिंतामण बागुल हि २ फेब्रुवारी २०२३ पर्यत मालेगांवच्या कँम्प रोडवरील समर्थ हाँस्पीटलमध्ये उपचार घेत असताना तिचा मृत्यू दाखला एक महिना अगोदरच बनविण्याची कुबुध्दी ग्रामसेवक प्रल्हाद खैरनार यांना कशी सुचली.या षडयंत्रामागे कोणत्या राजकीय शक्तीचा हात आहे,किंवा ग्रामसेवक खैरनारला कुणाचा आशिर्वाद आहे.की,खैरनारने जीवित असलेली व्यक्ती अगोदरच कागदोपत्री मारुन टाकण्याचे धाडस केले.खोटे व बनावट कागदपत्र बनवून सामान्य नागरीकांची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेवक खैरनार विरुध्द प्रशासन आता नेमकी काय कार्यवाही करते हि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी “युवा मराठा”ने गटविकास अधिकारी यांचेशी दुरध्वनीव्दारे संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.दरम्यान खोटे व बनावट कामे करुन शासनाबरोबरच सामान्य नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या अशा अकर्तबगार ग्रामसेवकांविरुध्द लवकरच मालेगांव पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा युवा मराठा महासंघाने दिला आहे.

Previous articleदबंग पोलीस अधिकारी विलास पाटील यांची शेगावात एंट्री
Next articleछत्रपती शिवाजी महाराज वाडी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोळा उत्साहात संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here