राजेंद्र पाटील राऊत
🛑 सामाजिक संदेश व वृत्तपत्रांचे महत्व दर्शविणाऱ्या छत्रीचे अनावरण 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕वृत्तपत्र विक्रेत्यांनी आज आपल्या स्टाॅलवर सामाजिक संदेश व वर्तमानपत्राचे महत्व दर्शविणाऱ्या संदेश-छत्रीचे अनावरण केले.
या छत्रीच्या माध्यमातुन वृत्तपत्रांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचेल व वृत्तपत्र विक्रेत्यांचे ऊन व पावसापासून संरक्षणही होईल, ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवूनच श्री.संजय चौकेकर व श्री.जीवन भोसले यांनी ही छत्री तयार करून घेतली.
दादर विभागातील ८५ वर्षे कार्यरत वृत्तपत्र स्टाॅलवरुन अविरतपणे वाचकांना सेवा देणार्या अजित सहस्रबुद्धे यांच्या स्टाॅलवर, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री. हरी पवार व लोअर परळ विभागातील वाचक व दानशुर व्यक्ती श्री.निलेश मानकर यांच्या हस्ते मोठ्या छत्रीचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने मधुसूदन सदडेकर, जीवन भोसले, रवी चिले, प्रकाश गिलबिले, सुशांत वेंगुरलेकर, शंकर रिंगे व धनंजय वायाळ उपस्थित होते. ⭕