Home मुंबई प्लासमा डोनेट करण्यासाठी झेप प्रतिष्ठान ठाणे करत आहे आव्हान 🛑

प्लासमा डोनेट करण्यासाठी झेप प्रतिष्ठान ठाणे करत आहे आव्हान 🛑

132
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 प्लासमा डोनेट करण्यासाठी झेप प्रतिष्ठान ठाणे करत आहे आव्हान 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

ठाणे:-⭕गेल्या १५ दिवसासापासून कोरोना चे संकट घोंगावत असताना लोकांना बेड पासून प्लास्मा मिळवण्या पर्यंत अथक परिश्रम करावे लागत होते.आपला पेशंट हॉस्पिटल मध्ये असताना मानसिक रित्या खचलेल्या पेशंटच्या नातेवाइकांना या सर्व गोष्टींसाठी जिथे मिळेल तिथे वणवण भटकत राहावे लागतं आहे.पण या परिस्थितीवर मात करण्यासाठी झेप प्रतिष्ठान या संस्थेने ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक भागात विविध संस्था ब्लड बँक आणि Plasma दात्यांकडून मदत मिळवत लोकांना हॉस्पिटल बेड्स, प्लास्मा, रक्त, ambulance आणि इंजेक्शन मिळवून देण्यात कसोशीने प्रयत्न केले आहेत.

झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर गेल्या १५ दिवस तब्बल ७४ जणांना plasma, २४ बेड, १७ इंजेक्शन तसेच २ रक्तदाते दिले आहेत. २४*७ सतत मदतीसाठी तयार असणाऱ्या झेप प्रतिष्ठानला दिवसाला १०० कॉल येत आहेत पण पेशंटचे वाढलेल्या आकड्याने सर्वच सुविधांवर ताण येत असून भरपूर वेळा पेशंटला नाही सुद्धा म्हणावं लागतं अशी खंत झेप प्रतिष्ठानचे विकास धनवडे यांनी व्यक्त केली.

लोकांमध्ये प्लास्मा दान या विषयी जनजागृती होण्याकरिता सोशल मीडिया तसेच लोकचळवलितून झेप प्रतिष्ठानचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारने ही त्यांच्या परीने जास्तीत जास्त प्लास्मा डोनेशन साठी जागृती करणे गरजेचं आहे. कोरोना तून बरे झालेले पेशंट काही बाबींच्या पूर्तता केल्यावर किमान २ लोकांचे प्राण वाचवू शकतात.त्यामुळे या जीवघेण्या संकटातून सहिसलामत सुटलेल्या लोकांनी पुढे येऊन plasma dan करावा आणि लोकांचे प्राण वाचवावे असे आवाहन झेप प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे…⭕

Previous articleखेड तालुक्यातील मुसाड- वावे हॉस्पिटल रस्त्याची दुरवस्था 🛑
Next articleकोरोनामुळे जीवनशैलीच्या बदलासह रूढी-परंपरेलाही छेद💥
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here