Home संपादकीय मालेगांवचा उदयोन्मुख उगवता तारा ,सामाजिक कार्यातला संजय महाले पाटील हिरा

मालेगांवचा उदयोन्मुख उगवता तारा ,सामाजिक कार्यातला संजय महाले पाटील हिरा

175
0

*मालेगांवचा उदयोन्मुख उगवता तारा ,सामाजिक कार्यातला संजय महाले पाटील हिरा*
मालेगांव,(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)- फुलाला आपल्या सुगंधाची जाहिरात हि कधीच करावी लागत नाही.कारण फुलांची बाग किती अंतरावर आहे,आणि कोणत्या दिशेला आहे याचा अंदाज त्याच्या सुवासावरुनच येतो.तसेच,समाजात कार्यरत असलेल्या काही व्यक्तीचा परिचय देखील त्यांचे कर्तृत्वच करुन देते.नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहरात वास्तव्यास असलेले संजय नामदेव महाले पाटील यांच्या कार्यकर्तबगारीचा परिचय “युवा मराठा”च्या प्रेक्षक -दर्शकांना व्हावा म्हणून हा लेखनप्रपंच!
माणूस हा नावाने नाही तर त्याच्या कर्तबगारीने मोठा होतो.शुन्यातून विश्वाकडे भरारी घेणाऱ्या संजय महाले पाटील यांचा जीवनप्रवास तसा अत्यंत संघर्षमय व खडतर वाटेवरुन वाटचाल करणारा असाच आहे.संजूभाऊचे वडिल कै.नामदेव काळू महाले पाटील हे मुळचे दाभाडी या गावचे.तात्याभाऊ महाले आणि संजय महाले हे दोघे बंधू घरची अत्यंत गरीबीची परिस्थिती असतानाही,अगदी लहानपणापासूनच गोरगरीबांच्या मदतीला आवर्जुन उभे राहणारे अवलिया म्हणून सगळ्यांना परिचीत असलेले व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात होते,वडिल नामदेव काळू पाटील हमालीचे काम करुन कुटूंबाचा काबिला जसा तसा चालवित असताना,लहान वयातच संजूभाऊनी मिळेल ते कामे केलीत.खडतर वाटचाल करीत असताना गरीबीचे चटके अगदी जवळून अनुभवले.गरीबीचे दुःख भोगले.मात्र त्या लहानपणीच्या काळातही त्यांनी कधी आपल्या गरीबीचे दुःख इतरांना कधी जाणवूच दिले नाही.परोपकार हि मनोवृती त्यांनी लहानपणीच अंगी बाळगलेली असल्याने पुढे अनंत खस्ता खात संजय महाले पाटील हे आपले बंधू तात्याभाऊ समवेत आपल्या व्यवसाय उद्योगात स्थिरस्थावर झाल्याने त्यांनी आपले जीवनच समाजकार्यासाठी वाहुन घेतले.असे कोणतेच क्षेत्र नाही.की तेथे संजूभाऊचे नाव नाही.आज मालेगांवच्या सार्वजनिक सामाजिक क्षेत्रात सर्वप्रथम संजूभाऊचे नाव अग्रक्रमाने पुढे असते.मराठा समाजाची दिनदर्शिका दरवर्षी स्वखर्चाने छापून विनामुल्य वितरण करणारे संजय महाले व कुटूंबियांचे योगदान खरेच मराठा समाजाला आदर्श निर्माण करणारे प्रेरणास्थान म्हणून प्रेरणास्त्रोत म्हणून निश्चितच उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.त्याशिवाय दातृत्व कशाला म्हणतात हा आदर्श संजय महाले पाटील यांच्याकडून शिकण्यासारखा आहे,प्रत्येक धार्मिक कार्याला आर्थिक मदतीचा हातभार तर सदैव असतोच.पण त्याही पलिकडे गोरगरीबांच्या दवाखान्याचा खर्च,विविध अडचणी समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे संजय महाले पाटील खरोखरच मालेगांवचा उदयोन्मुख उगवता तारा आहे असे म्हटले तर वावगे काहीच ठरु नये.साकूर ता.मालेगांव सारख्या खेडेगांवातील मंदीराला आर्थिक मदतीचा हात देताना निसंकोच वृतीने त्यांचे कार्य अधोरेखीत करावेच लागते.स्वप्नपुर्तीनगरातही मंदीराना भरभरून दान देणारे संजय महाले पाटील गोरगरीबांच्या सुख दुःखातही तेवढयाच हिररीने सहभागी होतात.कुणाचेही घरगुती वादाविवादाचे प्रसंगही असले तरी ते हे प्रश्नही मोठ्या सामजस्यांने सोडवून कुटूंबात सलोखा निर्माण करण्याचेही महान कार्य करतात.एकंदरीत काय तर सामाजिक कार्याचा एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करणारा अवलिया म्हणूनच संजय महाले पाटील यांची ओळख होते.मागील वर्षी कोल्हापूर भागात आलेल्या महापुरात उध्वस्त झालेले संसार सावरताना मालेगांवातून दिड दिवसाची मदतफेरी स्वतः संजूभाऊनी काढून पुरग्रस्त भागात प्रत्यक्ष स्वतःच्याच हाताने मदत पोहचविली.तो आनंद काही अनोखाचा होता.आणि आताही कोरोनासारखे महाभयंकर संकट आलेले असताना आणि मालेगाव शहर हे कोरोनाचे हाँटस्पाँट असतानाही संजय महाले पाटील यांनी मालेगांवात ठिकठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस बांधवासाठी स्व-खर्चाने पाणी उपलब्ध करुन दिले.स्वतःच्या घरातून या पोलिस बांधवासाठी चहा पोहचविण्याबरोबरच आपल्या पुजा टेन्ट हाऊसच्या माध्यमातून विनामुल्य गाद्याही उपलब्ध करुन दिल्यात.हे कार्य करताना संजूभाऊनी कुठलाही गाजावाजा केला नाही किंवा देखावा दाखवला नाही,हे विशेष!संजूभाऊना या सामाजिक कार्यात त्यांच्या आई श्रीमती सुमनताई नामदेव महाले पाटील,पत्नी सौ.उषाताई संजय महाले पाटील,पुतणे राकेश सुरेश महिले पाटील,पवन तात्याभाऊ महाले पाटील, जावई हितेंद्र गंगाराम पाटील आदीचे अनमोल असे सहकार्य व पाठबळ संजूभाऊना मिळत आहे.म्हणूनच संजूभाउची हि सामाजिक कार्याची पताका डौलाने आणखीनच फडकावत आहे.कोरोना सारख्या महामारी संकटात संजूभाऊनी मालेगावात बंदोबस्तावर असलेल्या पोलिस बांधवाना रोजचे सुमारे ३०० थंडगार पाण्याचे जार पुरविण्याबरोबरच स्वतःच्या मालकीचे कुलर पंखे देखील पोलिसांना उपलब्ध करुन दिलेत.संजूभाऊनी कोरोना संकटाचे लाँकडाऊन सुरु झाले तेव्हा पासून आजपर्यंत सुमारे पाच लाख रुपयापर्यत आलेला खर्च स्वतः च केला.यात संजूभाऊ व त्यांच्या कुटूंबियांना एक वेगळाच आनंद या अनोख्या पध्दतीने केलेल्या सामाजिक कार्यातून मिळत असल्याचे बघावयास मिळते.एका बाजुला या शहरातील राजकारणी व परिसराचे नगरसेवक देखील कुठलीही मदत फक्त राजकारणासाठीच करत असल्याचे सर्वश्रुत असतानाच संजूभाऊचा आदर्श सर्वदूर पोहचणे हिच खरे तर काळाची गरज आहे. तसे बघितले तर आजकाल मदतीच्या नावाखाली गल्लीबोळात फिरुन तुटपुंजी मदत पुरविणारे चमकोगिरी करायला आघाडीवर असतात हे बघितले की,तथाकथित समाजसेवक कुठे आणि निस्वार्थ भावनेने कुठलीही अपेक्षा न बाळगता निष्पाप मनाने संजय महाले पाटील यांचे सुरु असलेले सामाजिक कार्य कुठे?याचा साहजिकच जरी विचार केला तरी आमची निश्चितच अभिमानाने मान उंचावते.कारण कुठलाच गर्व घमेंड नसलेला संजय महालेसारखा एक सामाजिक कार्याने झपाटलेला अवलिया “युवा मराठा न्युज”चँनलच्या कार्यकारी संपादक पदावर कार्यरत असल्याचा आम्हांला निश्चितच सदैव अभिमान आहे,त्याचबरोबर संजय महाले पाटील यांच्या कार्याला आमचा मानाचा सलाम व “युवा मराठा “परिवाराच्या वतीने संजूभाऊच्या भावी वाटचालीस लाखमोलाच्या अनमोल शुभकामना…!!

Previous articleराष्ट्रपतींकडून देशवासीयांना ईद उल फित्र निमित्त शुभेच्छा
Next articleपुण्यात लष्कराच्या जवानाचे पत्नीवर चाकूने केले सपासप वार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here