राजेंद्र पाटील राऊत
🛑 खेड तालुक्यातील मुसाड- वावे हॉस्पिटल रस्त्याची दुरवस्था 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
रत्नागिरी/खेड:-⭕खेड तालुक्यातील मुसाड गावात पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून 10 वर्षांपूर्वी रस्ता डांबरीकरण झाला होता.त्यानंतर आतापर्यंत या रस्त्यावर डांबरीकरण झाले नाही.
आता या रस्ताची खूपच वाईट अवस्था झाली आहे.हा रस्ता चिपळूण वरून मुसाड, वावे, चोरवणे असा कमी अंतर असलेला कमी वेळात पोचण्यासाठी हा सोयीस्कर रस्ता आहे .आता या रस्त्याची वाईट अवस्था झाली असून दररोज अपघात होत असतात.
लोक प्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.तरी या रस्त्याची पाहणी करून लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण करावे नाहीतर पावसाळ्यात या रस्त्यावर वाहुतक करणे अवघड होऊन जाईल.⭕