Home कोरोना ब्रेकिंग कोरोनामुळे जीवनशैलीच्या बदलासह रूढी-परंपरेलाही छेद💥

कोरोनामुळे जीवनशैलीच्या बदलासह रूढी-परंपरेलाही छेद💥

125
0

राजेंद्र पाटील राऊत

💥 कोरोनामुळे जीवनशैलीच्या बदलासह रूढी-परंपरेलाही छेद💥

वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे

संपूर्ण जगासह देशाला विळख्यात घेतलेल्या कोरोना विषाणूने देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आणत मानवाची जीवनशैलीही बदलली आहे. मोठ्या थाटामाटात होणारे विवाह सोहळे मोजक्यांच्याच उपस्थित होऊ लागले. एवढेच नव्हे, तर मृत्यूनंतरचे कर्मकांडही करता येत नसल्याने कोरोनाने थेट रूढी – परंपरेलाही छेद दिला आहे. डोळ्याने न दिसणाऱ्या एका विषाणूने घडवलेला बदल आता प्रत्येकाच्या अंगवळणी पडत आहे.
गेल्या मागच्या वर्षांपासून देशात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूने ऐतिहासिक बदल करीत सुरळीत चाललेल्या माणसाच्या आयुष्यालाही मोठे वळण दिले आहे. कोरोनाचा होणारा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत असल्याने उपाययोजना करताना शासनाच्या नाकीनऊ येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा मुख्य पर्याय असल्याने गर्दी टाळण्यासाठी इतिहासात पहिल्यांदा बस, रेल्वे, विमानाची चाके थांबली आहेत. मोठमोठे उत्सव, सण, विवाहसोहळे शासनाला रद्द करावे लागल्याने नेहमीच गर्दीत हरवून गेलेला माणूस एक वर्षापासून एकाकी पडल्याचे जाणवत आहे. प्रत्येक धर्मातील अतिमहत्त्वाचे सण, सार्वजनिक उत्सव घरीच साजरे होताहेत. हजारोंच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नसोहळ्यांना बोटावर मोजता येतील एवढ्यांचीच उपस्थिती पाहायला मिळतेय. यामुळे खर्चाची बचत होत असली तरी यावर अवलंबून असलेल्या मंडप, साउंड, केटरिंग, फोटोग्राफर, आचारी, ब्युटीपार्लर, डीजे यांसारख्या व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. हॉटेलच्या चटकदार जेवणाची चव आता घरच्या भाज्यांवरच भागवावी लागतेय, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी जिवलगांचे आलिंगनही विस्मरणात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर अनेक धर्मांत पिढ्यानपिढ्या चालत आलेले मृत्यूनंतरचे कर्मकांडही कोरोनामुळे बंद झाले आहे. ना पिंडदान, ना दशक्रिया विधी, ना तेरवा, ना वर्षश्राद्ध. यामुळे थेट परंपरेलाच छेद बसत असल्याने नागरिकांचाही नाइलाज झाला आहे.
—— –

Previous articleप्लासमा डोनेट करण्यासाठी झेप प्रतिष्ठान ठाणे करत आहे आव्हान 🛑
Next articleसटाणा-देवळा रस्त्यावर अपघात एक जागीच ठार!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here