राजेंद्र पाटील राऊत
पन्हाळा तालुक्यात आई-वडीलांची मुलासह नदीत उडी घेऊन आत्महत्या
नवे पारगाव प्रतिनिधी : गोठे तालुका पन्हाळा येथील पती पत्नीने आपल्या लहान मुलासह सामुहिक आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पन्हाळा तालुक्यातील कुंभी नदीपात्रात तिघांचे मृतदेह सापडले असून आई-वडिलांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला दोघांच्यामध्ये दोरीने बांधून कुंभी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.
गोठे गावातील दीपक शंकर पाटील वय ४०, वैशाली दीपक पाटील वय ३५ यांनी आपला १४ वर्षाचा मुलगा विघ्नेश याला आपल्याबरोबरच हाताला दोरीने बांधून घेऊन कुंभी नदीच्या पात्रात उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना उघड होताच संपूर्ण गाव नदीत पात्राकडे धावला. गोठे गावात आपले वडील, पत्नी आणि दोन मुले यासह राहत असलेले दीपक पाटील हे शेती व्यवसाय करीत होते. या बरोबरच जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करीत होते. घरी खाऊन पिऊन सुखी असलेल्या या कुटुंबाच्या आत्महत्येने संपूर्ण कळे परिसर हळहळला. त्यांची १६ वर्षाची मुलगी मामाच्या गावी गेल्यामुळे या घटनेतून सुखरूप आहे.
दीपक पाटील यांनी आत्महत्ये करणेपूर्वी घरात सुसाईड नोट लिहून ठेवली आहे .यामध्ये जीवनात अयशस्वी झालो आहे. आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरुनये. माझ्या वडिलांना आणि मुलीला सांभाळा असा मजकूर लिहिला आहे. याबाबतची वर्दी कळे पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील सपोनि प्रमोद सुर्वे यांच्यासह येवून तपासाबाबत सूचना दिल्या. मात्र नेमकं आत्महत्येचं नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.(युवा मराठा न्युज नेटवर्क)