राजेंद्र पाटील राऊत
कोल्हापूरात सबजेल मधील ३१ कैद्याना कोरोनाची लागण
कोल्हापूर 🙁 मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी रात्री कोल्हापूरातील बिंदू चौक सबजेलमधील ३१ बंदीजंनाना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ माजली.
कारागृह प्रशासन हादरले असून, तातडीने कारागृहात सँनिटाइझ फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर कारागृहातच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु केले आहे.
तसेच कारागृहातील ८२ कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.
यामध्ये तब्बल ३१ कैद्यांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संबंधित कोरोना रुग्णांवर कारागृहातच कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून, योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी दिली.