Home पुणे १८ वर्षांपुढील नागरिकांनाही लस द्या 🛑

१८ वर्षांपुढील नागरिकांनाही लस द्या 🛑

147
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 १८ वर्षांपुढील नागरिकांनाही लस द्या 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕केंद्र सरकारकडे प्रस्ताव
पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक झाली असल्याने पुण्यातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने पुण्यासाठी विशेष बाब म्हणून धोरणात्मक निर्णय घेतल्यास पुण्यात दररोज सुमारे एक लाख नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाची पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही सर्वाधिक झाली आहे. दुसर्‍या लाटेचे प्रमाण कमी करायचे असेल, तर लसीकरण हा प्रमुख उपाय आहे.

डॉक्टर आणि अन्य तज्ज्ञांच्या मते लसीकरणामध्ये पुण्याला प्राधान्य दिले पाहिजे. केंद्र सरकारच्या धोरणात बदल करण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. पुण्यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याचा निर्णय झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होऊन सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ शकेल.

सध्या जिल्ह्यात दररोज 23 ते 24 हजार लोकांना लस देण्यात येत आहे. हे प्रमाण वाढविले, तर परिस्थिती आटोक्यात येईल. 16 जानेवारीला पुण्यात 31 लसीकरण केंद्रे होती. दहा मार्चला केंद्रांची संख्या 208 झाली आहेत. बहुतांश आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले आहे. लशींचा साठा उपलब्ध करून देणे आणि लसीकरण केंद्रांमध्ये आणखी वाढ करण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याची सूचना पवार यांनी केली आहे; तसेच खासदार गिरीश बापट आणि श्रीरंग बारणे यांनीही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून मागणी मान्य झाल्यास पुण्यात दररोज सुमारे एक लाख नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे, असे राव यांनी स्पष्ट केले.

कोरोनाबाधित रुग्णांना घरामध्येच विलगीकरण केले जात आहे. आता संस्थात्मक विलगीकरण वाढविण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर घरी विलगीकरण केलेल्या रुग्णांचे समुपदेशन करण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दोन्ही महापालिकांना देण्यात आल्या आहेत, असे राव म्हणाले.

चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. ससून रुग्णालयाला निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, त्या ठिकाणी दररोज 700 ते एक हजार चाचण्या करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) या ठिकाणी चाचण्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत’ असे राव यांनी सांगितले. महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे’ असे राव म्हणाले.

जम्बो कोविड सेंटर होणार सुरू
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालात उभारण्यात आलेले जम्बो सेंटर हे सुरू केले जाणार आहे. दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेने जम्बो सेंटरचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे.

त्याबाबतचा सकारात्मक अहवाल आला आहे. या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती राव यांनी दिली. ⭕

Previous articleजेव्हा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई खासदार छत्रपती उदयनराजेंना भररस्त्यात मुजरा करतात तेव्हा. 🛑
Next articleक. डों. म.महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा ६७ हजारांचा टप्पा पार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here