• Home
  • पुढच्या काही दिवसांमध्ये पुण्यात “हे” निर्बंध घालावे लागतील; महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन 🛑

पुढच्या काही दिवसांमध्ये पुण्यात “हे” निर्बंध घालावे लागतील; महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210311-WA0085.jpg

🛑 पुढच्या काही दिवसांमध्ये पुण्यात “हे” निर्बंध घालावे लागतील; महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात कोरोन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत असून, काही भागांमध्ये सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निर्माण झालेली आहेत. साधारणपणे १ मार्च २०२१ ला तपासलेल्या रुग्णांपैकी पावणे नऊ टक्के नागरिक कोरोना बाधित निघत होते.

मात्र त्यानंतरच्या दहा दिवसांचा विचार केला असता आता १० मार्च २०२१ ला तोच आकडा वाढून साडे सतरा टक्क्यांच्या पुढे गेला आहे. म्हणजे दहा दिवसात जवळपास तपासलेल्या नागरिकांपैकी कोरोनाबाधीतांच्या संख्येत अंदाजे ९ ते १० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत, पुढील काही दिवसांमध्ये पुण्यात काही निर्बंध घालण्याचे सुतोवाच केले असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन महापौरांनी केलंय. पाहूयात काय म्हणत आहेत महापौर मुरलीधर मोहोळ.⭕

anews Banner

Leave A Comment