• Home
  • गजा मारणेची अभिनव देशमुखांनी केली थेट येरवड्यात रवानगी🛑

गजा मारणेची अभिनव देशमुखांनी केली थेट येरवड्यात रवानगी🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210308-WA0099.jpg

🛑 गजा मारणेची अभिनव देशमुखांनी केली थेट येरवड्यात रवानगी🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फरारी झालेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने जेरबंद केले.

फरारी झाल्यानंतर त्याचे वास्तव्य मेढा, वाई, महाबळेश्वर परिसरात होते. तो मेढ्यात शनिवारी (ता. ६ मार्च) डस्टर गाडीतून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली

सातारा जिल्ह्यातील मेढा येथे पोलिसांनी काल पकडलेला कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देखमुख यांनी आज थेट येरवड्यात पाठवले. ‘एमपीडीए’ अंतर्गत गजाची एक वर्षासाठी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फरारी झालेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला मेढा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने जेरबंद केले. फरारी झाल्यानंतर त्याचे वास्तव्य मेढा, वाई, महाबळेश्वर परिसरात होते. तो मेढ्यात शनिवारी (ता. ६ मार्च) डस्टर गाडीतून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी सापळा रचत गुंड गजा मारणे याच्या मुसक्‍या आवळल्या. त्यानंतर त्याला पुणे जिल्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेल्या गजा मारणे याने जेलमधून पुण्यापर्यंत शक्ती प्रदर्शन करत पुणे-मुंबई महामार्गावर धुडगूस घातला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा लावली होती. मात्र, पुणे पोलिसांना गुंगारा देत गजा मारणे हा फरारी झाला होता.

फरारी झालेला गजा मारणे हा महाबळेश्वरच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, शनिवारी जावळी तालुक्‍यातील मेढा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी गजा मारणे याला जेरबंद केले.⭕

anews Banner

Leave A Comment