• Home
  • पवार झारखंडच्या दौऱ्यावर, धोनीच्या नावावर पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न.? पाहा काय म्हणाले पवार?🛑

पवार झारखंडच्या दौऱ्यावर, धोनीच्या नावावर पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न.? पाहा काय म्हणाले पवार?🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210308-WA0100.jpg

🛑 पवार झारखंडच्या दौऱ्यावर, धोनीच्या नावावर पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न.? पाहा काय म्हणाले पवार?🛑
✍️ झारखंड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

झारखंड :⭕राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, झारखंड दौऱ्यावर आहेत.

भाजपच्या सत्ताकाळात काँग्रेस पक्षाचं संघटन कमकुवत होतं चाललंय अशा परिस्थितीत 81 व्या वर्षी गैर भाजप मतदारांना एका नवा पर्याय देण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. आज झारखंडमध्ये राज्यस्तरीय कार्यकर्त्यांना शरद पवार यांनी संबोधित केलं.

यावेळी त्यांनी झारखंडचा लोकल बॉय तथा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर स्तुतीसुमने उधळली.

“राहुल द्रविडने ज्यावेळी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देशासमोर पुढचा कर्णधार कोण, असा यक्ष प्रश्न उभा ठाकला. त्यानंतर झारखंडचा एक मुलगा, महेंद्रसिंग धोनी त्याचं नाव… सचिन तेंडुलकरने त्याच्या नावाची शिफारस केली आणि पुढे भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय होण्यासाठी धोनीने कष्ट घेतले”, अशी स्तुती शरद पवार यांनी केली.

*शरद पवार नेमके काय म्हणाले…?*

“भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान देणाऱ्या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. भारताच्या इंग्लंड दौर्‍यादरम्यान राहुल द्रविडने मला सांगितले की कर्णधारपदाचा त्याच्या खेळावर परिणाम होत आहे आणि त्याला द्यायचा आहे. यानंतर मी सचिन तेंडुलकरला पदभार स्वीकारण्यास सांगितला पण त्यानेही नकार दिला.”
“त्यानंतर मी सचिनला विचारलं की संघाचं नेतृत्व कोण करणार? त्यावेळी त्याने धोनीच्या नावाची शिफारस केली. तो म्हणाला “आपल्याकडे एक खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय करू शकतो आणि त्यानंतर धोनीला ही जबाबदारी देण्यात आली, ज्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटला जगभरात लोकप्रियता मिळाली. एक अढळ स्थान मिळालं, असं शरद पवार म्हणाले.”

“देशभरात प्रेम, बंधुभाव, वाढेल किंवा तसं वातावरण निर्माण करायची केंद्राची जबाबदारी असते. केंद्रात सत्ते असलेलं भाजप देशात जातीय विष पसरवत आहे. शेतकरी गेल्या 100 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर बसला आहे. आपल्या हक्कांसाठी तो लढतो आहे पण केंद्रातील सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. दिवसांपासून निषेध करीत आहेत, पंतप्रधानांना कोलकात्याला जाण्यासाठी वेळ आहे. तिथल्या पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला वेळ आहे पण इथे दिल्लीतल्या मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही”, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.⭕

anews Banner

Leave A Comment