• Home
  • पुण्यात रुग्ण वाढीचा आलेख वाढताच,आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ🛑

पुण्यात रुग्ण वाढीचा आलेख वाढताच,आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210308-WA0097.jpg

🛑 पुण्यात रुग्ण वाढीचा आलेख वाढताच,आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली.

त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून भारतात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

पुणे शहरात आज नव्याने ९८४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ०८ हजार ३३० इतकी झाली आहे. शहरातील ७५० कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या १ लाख ९६ हजार ७५१ झाली आहे.

शहरात आज एकाच दिवसात ६ हजार ७४३ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ११ लाख ९२ हजार ००२ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ६ हजार ६८९ रुग्णांपैकी ३४१ रुग्ण गंभीर तर ६८२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ४ हजार ८९० इतकी झाली आहे.पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शहरात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता संपर्क शोध मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र तरीही आकडे काही कमी होत नाहीयेत.

यामुळे आता पुणेकरांची चिंता निशितच वाढलेली पाहायला मिळत आहे.⭕

anews Banner

Leave A Comment