राजेंद्र पाटील राऊत
🛑 बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ आणि वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्या वतीने जागतिक महिला दिनी नारी शक्तीचा सन्मान🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕कोरोना संकट काळात
डाॅ.सारिका पाटील.नायर हॉस्पिटल ( डीन) यांनी एका योद्ध्याप्रमाणे आपल्या जीवाजी तमा न बाळगता दिवस- रात्र अविरत मेहनत घेऊन नायर रुग्णालयातील १२ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केले. ७५० हूनही जास्त कोरोना बाधित महिलांचे यशस्वी बाळंणपण आपल्याच देखरेखीखाली झाले. एक विक्रम म्हणून नोंद घेण्याजोगी ही कामगिरी आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. सारिका पाटील यांचा सन्मान कोविड रणरागिनी म्हणून..
बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेतर्फे संजय चौकेकर, बाळा पवार, जीवन भोसले, भालचंद्र पाटे, प्रशांत ब्रीद, श्रीकांत शिगवण, प्रदीप सातार्डेकर, मंगेश भोजे,प्रशांत जानवलकर व विजय पवार (युवा मराठा न्युज, प्रतिनिधी ) उपस्थितीत होते…⭕