Home परभणी चारठाणा पोलिस स्टेशन अंतर्गत कागदपत्रे नसलेल्या सहा दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

चारठाणा पोलिस स्टेशन अंतर्गत कागदपत्रे नसलेल्या सहा दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

36
0

आशाताई बच्छाव

IMG-20220703-WA0025.jpg

चारठाणा पोलिस स्टेशन अंतर्गत कागदपत्रे नसलेल्या सहा दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

शत्रुघ्न काकडे पाटील :-ब्युरो चिफ(युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिंतूर तालुक्यातील चारठाणा पोलिसांनी विशेष मोहीम राबवून विना नंबर, ट्रिपलसिट, लायसन्स, कागदपत्रे या संदर्भात सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी तपासणी मोहिम राबविण्यात आली. सहा दुचाकीस्वाराकंडून 8 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर सहा दुचाकीस्वारांकडे कागदपत्रे अढळून आली नसल्याने या दुचाकी पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या. ही तपासणी मोहिम आज शनिवारी राबविण्यात आली.
चारठाणासह ग्रामीण भागात अल्पवयीन मुले भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. चारठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विष्णूदास गरुड, शिवदास सुर्यवंशी, अजय रासकटला यांनी पोलीस ठाण्यासमोरून जाणारी वाहने थांबवून ट्रिपलसिट, विना नंबरप्लेट, कागदपत्रे तपासणी, अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन दिल्यासंदर्भात तपासणी मोहिम राबविली. यामध्ये अनेक दुचाकींची तपासणी करण्यात आली. सहा दुचाकीस्वारांकडून 8 हजार 500 रूपयाचा दंड वसूल करून सहा दुचाकीस्वारांकडे कागदपत्रे आढळून आली नसल्याने या दुचाकी पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अल्पवयीन वाहनधारकांची संख्या कमी होऊन अपघातास आळा बसण्यास मदत होणार आहे. या मार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ही मोहिम राबविण्यास सुरुवात केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
कागदपत्रे नसल्यास कारवाई – सपोनि गायकवाड चारठाणा भागातील वाहनांची तपासणी केली असता अनेक दुचाकीस्वाराकडे कागदपत्रे नसून यासह लायसन्स नसताना तसेच अल्पवयीन मुलाकडून वाहन चालविण्याचे प्रमाण जास्त आहे. पालकांनी अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देऊ नये. दरम्यान, दुचाकीस्वारांनी देखील कागदपत्रे असलेली वाहने चालवावी नसता वाहन धारकांविरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Previous articleपुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्षपदी मुकुंदराज कपाटे यांची फेरनिवड
Next articleअनसिंग गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामाच्या ठिकाणी शासन नियमानुसार माहिती फलक लावण्याची मागणी       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here