Home Breaking News नांदेड जिल्ह्यात कोव्हिड १९ विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत ३१ मार्चपर्यंत...

नांदेड जिल्ह्यात कोव्हिड १९ विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत ३१ मार्चपर्यंत वाढ

346
0

नांदेड जिल्ह्यात कोव्हिड १९ विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत ३१ मार्चपर्यंत वाढ

राजेश एन भांगे

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी बुधवार ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे.

साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या मधील तरतुदीनुसार १४ मार्च २०२०रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे.
तसेच फौजदारी प्रक्रिया दंडसंहिता १९७३ नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये दि. १ मार्च २०२१ रोजीच्या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश ३१ ऑक्टोंबर, ४,१५ व २८ नोव्हेंबर, ३०डिसेंबर २०२०आणि २९ जानेवारी २०२१ मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात बुधवार ३१ मार्च २०२१पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल.

तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही,

असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि. १ मार्च २०२१ रोजी निर्गमित केले आहेत.

Previous articleमुखेड तालुका परीचर कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी देवकत्ते तर सचिवपदी रजुरे यांची निवड
Next articleतुंगण दिगर येथे संघर्ष आदिवासी संघटनेची स्थापना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here