Home गडचिरोली सांसदिय संकुल विकास परियोजने अंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावांचा भौगोलिक...

सांसदिय संकुल विकास परियोजने अंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावांचा भौगोलिक विकास साधा. खा.अशोकजी नेते.

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0011.jpg

सांसदिय संकुल विकास परियोजने अंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावांचा भौगोलिक विकास साधा.
खा.अशोकजी नेते.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सांसदिय संकुल विकास परियोजने अंतर्गत भारत सरकारने धानोरा तालुक्यात 25 गावांची निवड करण्यात आली. या मूलभूत गरजांची पूर्तता करून विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे आहे. गावामध्ये मजुरवर्गाना व स्थानिक पातळीवरील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे जेणेकरून स्थानीक मजुर जिल्ह्याच्या बाहेर किंवा अंतर राज्यामध्ये रोजगारासाठी पलायन केले जाते ते थांबवून गावातील स्थानिक,लोकांना किंवा मजुरांना जाऊ नये याकरिता त्यांना सांसदीय विकास संकुल परियोजना अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे त्यासाठी धानोरा तालुक्यातील 25 गावांमध्ये, शासनाचे कर्मचारी म्हणून गावातील भौगोलिक विकास कसा साधता येईल. त्याकरीता ग्रामसेवक, तलाठी यांची भूमिका महत्त्वाची असते. या कार्यक्रमाप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी, सिंचाई विभाग,वनविभाग,भु विभाग,बँकिंग अधिकारी या सर्व विभागातील विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन 25 गावांचा विकासाच्या दृष्टिकोनातून संसदीय संकुल विकास परियोजना अंतर्गत चातगांव येथे विस्तारित बैठकीच्या कार्यक्रमाप्रसंगी मान.खा.अशोकजी नेते यांनी प्रतिपादन केले.
त्यावेळी सरपंच श्री.गोपालजी उईके,डॉ.खटी साहेब जि.उपाध्यक्ष,रेखाताई डोळस महिला प्रदेश सदस्य,अक्षय उईके,संजय बारापात्रे, टिचकुले (BDO),कोमलवार(ABDO),जुवारेजीफटिंगजी उपअभियंता,अमोल चकनलवार,तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावातील नागरिक तसेच संपूर्ण विभागाचे कर्मचारी, अधिकारीवर्ग, उपस्थित होते.

Previous articleजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बाबुरावजी मडावी यांना अभिवादन
Next articleवाघाने घेतला इंजेवारी येथील इसमाचा बळी।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here