Home गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुरग्रस्तांना दिली अर्थिक मदत

जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुरग्रस्तांना दिली अर्थिक मदत

114

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0030.jpg

जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुरग्रस्तांना दिली अर्थिक मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मोठा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची जिल्हा काँग्रेसची मागणी.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// जिल्ह्यात सद्या निर्माण झालेली पूरस्थिती पाहता जिल्हा काँग्रेस च्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या मार्गदर्शनात पूरग्रस्तांना प्राथमिक मदत करण्याकरिता जिल्हाभरात सगळया तालुक्यात हेल्पलाईन सुरू केले आहे.
नुकताच अहेरी तालुक्यातील पेरिमिली येथे एक ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेले, त्यामध्ये सीताराम तलांडे, शम्मी तलांडे, पुष्पा तलांडे असे मृतकाचे नाव असून याची माहिती जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांना मिळताच महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी अहेरी येथील काँग्रेस कार्यकर्ते रजाक खान, रुपेश बदेला, फिरोज खान, कोमल भुपेलावार यांच्याशी संपर्क त्यांच्या माध्यमातून मृतकाच्या कुटुंबास जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने 10 हजार रुपयांची तत्काळ आर्थिक मदत केली.
त्याचप्रमाणे या दुर्घटनेत मृत झालेल्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून 5 लाखाची आर्थिक मदत व जिल्ह्यातील अन्य पूर ग्रस्तांच्या पुर्नउभारणी करिता मोठया आर्थिक पॅकेज ची मदत राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे.

Previous articleलांझेडात जीर्णावस्थेतील घर कोसळले। जीवितहाणी नाही सर्व्हिस वायर तुटले,नगर परिषदेने हटविला मलबा
Next articleदसाना लघु मध्यम प्रकल्प ओव्हरप्लो
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.