Home गडचिरोली लांझेडात जीर्णावस्थेतील घर कोसळले। जीवितहाणी नाही सर्व्हिस वायर तुटले,नगर परिषदेने हटविला मलबा

लांझेडात जीर्णावस्थेतील घर कोसळले। जीवितहाणी नाही सर्व्हिस वायर तुटले,नगर परिषदेने हटविला मलबा

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0029.jpg

लांझेडात जीर्णावस्थेतील घर कोसळले।

जीवितहाणी नाही

सर्व्हिस वायर तुटले,नगर परिषदेने हटविला मलबा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-: गेल्या तीन चार दिवसापासून आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात कहर केला आहे.
अशातच आज पहाटेच्या सुमारास लांझेडा येथील जिर्णा अवस्थेत असलेले एक घर
कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही.घर कोसळल्याने घराचा
मलबा रहदारीच्या रस्त्यावर पडला व मीटर वायर ही तुटले.
घटनेची माहिती नागरिकांनी तलाठी तुंकलवार यांना दिली.तलाठ्यांनी घटनास्थळ
गाठून नगर परिषदेला माहिती दिली.लागलीच नगर परिषदेचे कर्मचाÚयारी दाखल झाले
व रस्त्यावरील मलबा हटवून पडण्यायोग्य भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडली. मात्र भविष्यात पुन्हा धोका होवू नये म्हणून
जिर्णावस्थेत असलेले संपूण घरच जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. तसेच
रस्त्यावर पडलेले सर्व्हिस वायर काही वेळाने उचलले. सर्व्हिस वायर रस्त्यावर पडले होते त्यामुळे काही काळ
रहदारीस अडथळा निर्माण झाला होता तर काही दुचाकीचालक यात अडकले सुद्धा. मात्र आता रहदारीचा
रस्ता मोकळा झाला आहे.

Previous articleगडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटच्या वतीने पूरपरिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीकरिता सुरू करण्यात आलेले हेल्पलाईन नंबर.
Next articleजिल्हा काँग्रेसच्या वतीने पुरग्रस्तांना दिली अर्थिक मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here