आझाद मैदान मुंबई येथे ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन सुरू..मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा संगणक परिचालकांचा ठाम निर्धार..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
ग्राम विकास व माहिती तंत्रज्ञान विभाग अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत ,पंचायत समिती, व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक कार्यरत असून दहा वर्षे प्रामाणिकपणे काम केलेल्या संगणक परिचालक यांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी केलेली असताना शासनाने त्याकडे अनेक वेळा आश्वासन देऊन दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संगणक परिचालकाना आय. टी. महामंडळाकडून कर्मचारीदर्जा, व किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी येत्या 22 फेब्रुवारी पासून राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती चे काम करणारे हजारो संगणक परिचालक आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसले असून मागण्या मान्य होईपर्यंत माघार न घेण्याचा ठाम निर्धार संगणक परिचालकानी घेतला आहे.
Home Breaking News आझाद मैदान मुंबई येथे ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन सुरू..मागण्या मान्य होईपर्यंत...