Home Breaking News अक्कड बक्कड बंबे बो 80 90 पुरे 100

अक्कड बक्कड बंबे बो 80 90 पुरे 100

164
0

राजेंद्र पाटील राऊत

अक्कड बक्कड बंबे बो 80 90 पुरे 100

_इंधन दरवाढ/गॅस संदर्भात शिवसेना मालेगांव चे आंदोलन_/प्रतिनीधी सतिश घेवरे मालेगाव

आजच्या वाढत्या इंधनवाढ/गॅस दरामध्ये अफाट वाढ होत असतांना सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेकांच्या नौकरी धंद्यांवर विपरीत परिणाम झालेले असतांना, लोकांचे रोजगार मेटाकुटीला गेलेले असताना ही सातत्याने होणारी इंधनदरवाढ सर्वसामान्यांना भेडसावणारी आहे आणि यामुळेच पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ कमी करण्यात यावी, यासाठी शिवसेना मालेगांव तर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले गेले. मालेगांव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी, उपजिल्हाप्रमुख श्री. प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख श्री. संजय दुसाने, महानगरप्रमुख श्री. रामभाऊ मिस्तरी, उपमहापौर श्री. निलेश आहेर, स्थायी सभापती श्री. राजाराम जाधव, उपसभापती श्री.सुनिल देवरे, युवासेना जि.प्र. श्री.विनोद वाघ, ज्येष्ठ नेते श्री.मनोहरबापु बच्छाव, महिला आघाडी सौ.संगिताताई चव्हाण, पं.स.सदस्य श्री.कृष्णा ठाकरे, उपमहानगरप्रमुख श्री.यशपाल बागुल, उपमहानगरप्रमुख श्री.दत्ता चौधरी, नगरसेवक श्री.राजेश गंगावणे, उपमहा.प्रमुख श्री.अमोल चौधरी, मातोश्री संघटना श्री.सुनिल चांगरे यांच्यासह ईतर शिवसेना पदाधिकारी, शिवसेना महीला आघाडी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

Previous articleवीजग्राहकांना नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये ग्राहक पंचायत संघटनेची मागणी
Next articleवनविभाग सुस्त बिबटया मस्त, वटार परीसरात बिबट्या शेळ्यांवर मारतोय ताव, ग्रामस्थ भयभीत, पशुधन धोक्यात  
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here