Home पुणे पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो…

पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो…

88
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे २१ जानेवारी ⭕युवा मराठा न्यूज प्रतिनिधी दिलीप चव्हाण पुणे⭕
पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो…आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो… असे मागणे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना कोश्यारी यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार गिरीष बापट, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, विनायक रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. गणरायाला अभिषेक झाल्यानंतर कोश्यारी हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आपण सर्वांनी धर्माचे रक्षण आणि पालन केले, तर आपला परिवार, देश व जगाचे कल्याण होईल. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जी सुंदर परंपरा सुरु केली आहे. ती आजही सुरु असून पुढील अनेक युगे ती सुरु राहिल. आपणही त्याच मार्गाने पुढे जाऊ असे सांगत गणपती बाप्पा मोरया चा जयघोष देखील त्यांनी यावेळी केला.

Previous articleसंगीता पाटील यांची ‘राष्ट्रवादी’त घरवापसी
Next articleमुखेड तालुक्यातील मौजे केरूर येथे ह.भ.प.परमेश्वर महाराज शहापूरकर यांचे कीर्तन अमृताचा सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here