• Home
  • संगीता पाटील यांची ‘राष्ट्रवादी’त घरवापसी

संगीता पाटील यांची ‘राष्ट्रवादी’त घरवापसी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210120-WA0063.jpg

संगीता पाटील यांची ‘राष्ट्रवादी’त घरवापसी*✍️(🔸राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)
नाशिकमधील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा संगीता अरुण पाटील यांची राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. अकोल्यातील माजी आमदार हरिदास भदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नाशिकचे विनायक काळदाते, सदाशिव वाघ, नागपूरचे भोई समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्षा अनिता भामरे, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, कायकर्ते व धगर समाजाच्या वतीने सांगिता पाटील यांचे स्वागत करण्यात आले आहे. याआधी पक्षात काम केलेलं असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, विचारांची जाण आहे. आता पक्षाचे हे विचार आणि विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील, असा विश्वास संगीता पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

anews Banner

Leave A Comment