• Home
  • गोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये दादांना श्रद्धांजली अर्पण : सभागृहाचेही नामकरण.

गोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये दादांना श्रद्धांजली अर्पण : सभागृहाचेही नामकरण.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210111-WA0198.jpg

गोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये दादांना श्रद्धांजली अर्पण : सभागृहाचेही नामकरण.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
रामतिर्थ : -शंकरनगर ( ता. बिलोली ) येथील गोदावरी मनार पब्लिक स्कुलमध्ये सोमवारी ता. ११ रोजी संस्थेचे उपाध्यक्ष, साहित्यिक, अभ्यासक मधुकरराव पाटील खतगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व मेनबत्ती पेटवून पूजन करण्यात आले .
व्यासपीठावर प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे, पत्रकार तथा साहित्यिक प्रदीप धोंडिबा पाटील, चेअरमन शेषराव रोकडे , हणमंतराव तोडे, दादाराव जाधव, शेषराव कंधारे, भास्कर पाटील रोकडे , मुरलीधर देगलूरे, सरपंच सुधाकर पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रद्धांजली कार्यक्रमात शेषराव कंधारे व भास्कर रोकडे यांच्या नंतर मधुकरराव पाटील खतगावकर सारखा निर्मळ, निष्कपट, माणूस शेकडो वर्षात ऐखादवेळा जन्मतो. तो या मातीत जन्माला आला. या मातीचे भाग्य उजळले. माझ्या सारख्या कितीतरी असंख्य लोकांना त्यांचा सहवास लाभला. अशा किती तरी लोकांचं आयुष्य त्यांच्या सहभावासाने समृद्ध झाले . अशी भावना प्रदीप धोंडिबा पाटील यांनी व्यक्त केली तर समारोपत मधुकरराव दादा हे मराठी भाषिक असूनही संस्कृतचे गाढे अभ्यासक व पंडित होते. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू पंडित विद्यासागर यांनी मधुकरराव दादाचा संस्कृतचे प्रकाड पंडित म्हणून गौरव केला आहे. भग्वतगीतेचा पगडा मोठा त्यांच्यावर होता. ते सुसंस्कृत व्यक्ती म्हणूनच आयुष्यभर जगले. असे सांगून दादा सोबत च्या अनेक आठवणींना उजाळा प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे यांनी दिला.
या प्रसंगी , रेखा पांडे, तेजप्रकाश तिवारी, सय्यद लालमोहमद, राम सूर्यवंशी, खंडू वाघमारे, स्वाती दोमाटे, शेरे पुष्पा, बालाजी रोकडे, यादव झडके, गणेश येरडे, नामदेव मुसंडे , शामसुंदर जाधव, शेख आवेज, सुरेखा वाघमारे याच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभागृहाचे नामकरण
————‐—–
पब्लिक स्कुलमध्ये एक नुकतेच नवीन सभागृह बांधण्यात आले आहे . या सभागृहाचे नाव ‘ मधुकरराव दादा खतगावकर ‘ असे ठेवण्यात येत असल्याची उद्घघोषणा यावेळी मान्यवरांच्या उपस्थित प्राचार्य दुर्गाप्रसाद पांडे यांनी केली.

anews Banner

Leave A Comment