• Home
  • 45 वर्षांनी भरली माजी. विध्यार्थांची शाळा

45 वर्षांनी भरली माजी. विध्यार्थांची शाळा

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210110-WA0013.jpg

45 वर्षांनी भरली माजी. विध्यार्थांची शाळा

घुणकी (कोल्हापूर ) : शिवराज विधालाय ऐतवडे खुर्द चे 1975 सालातील विध्यार्थी जवळजवळ 45 वर्षांनी एकत्र जमले निमित्त होत गेट टूगेदरचे निलेवाडी ता.हातकणंगले हे वारणा काठचे एक निसर्गरम्य गाव .स्वछता अभियानात सर्व योजनेत हे आघाडीवर आहे .या गावच्या विद्यामंदिरात त्या गावचे माजी सरपंच सुभाष भापकर व माजी केंद्रप्रमुख बबन टोपुगडे यांच्या पुढाकाराने एक सुंदर सोहळा संपन्न झाला .
निमित्त होते तब्बल ४५ वर्षानंतर एकत्र आलेले वर्गमित्र आणि त्यांचे स्नेह संमेलन.
शिवराज विद्यालय ऐतवडे खुर्द या शाळेतील १९७५ एस एस सी च्या तुकडीतील हे विद्यार्थी निलेवाडीत जमले .बबन टोपुगडे सर हे याच वर्गात होते .निलेवाडीच्या प्राथमिक शाळेत शिक्षक व राक्षी ता पन्हाळा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून शेवटची १४ वर्षे ज्ञानसेवेत घालवल्यानंतर ते निवृत्त झाले .शाळेची अत्यंत देखणी इमारत ,आणि तिला आणखी सजवण्यासाठी समोर ओळीने उभे असलेले पामवृक्ष ,दर्शनी च स्वागतास उभी असलेली देवी सरस्वती .आणि गर्द झाडीचे उंच कुंपण अशा या ज्ञानमंदिरात हा सोहळा साजरा करण्याकरिता शिवराज चे ते जुने विदयार्थी जमा झाले
४५ वर्षे म्हणजे जवळ जवळ अर्धे शतक एकमेकांशी दुरावलेल्या त्या वर्गमित्रांनी एकमेकांना बाहुत घेतले .त्यावेळचे त्यांचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते .
जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या हृदयातील भाव भावनांना वाट करून देतांना पापण्यांना चकवून अश्रू धारा गालावर उतरून पिकल्या मिशात कधि मिसळल्या हे कळलेच नाही .
दगडू वळीव हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ३३ वर्षे सेवेत होते .उपासे पोलीस खात्यात अधिकारी ,हंबीरराव मोहिते जि. प.शाळेत मुख्याध्यापक ,सर्जेराव जाधव सेवानिवृत्त शिक्षक.कांही प्रगतिशील शेतकरी .कांही दुकानदार असे सगळेच आपल्या हरवलेल्या बालपणाला शोधत होते.त्यांचे त्यावेळचे हेड मास्तर व्ही. आर .भोसले .मराठीचे शिक्षक,एम बी पाटील .पूर्वीचे हेडमास्तर पवार ,लगारे ,शिवाजी पाटील,येवले आणि त्यांचे लाडके शिपाई मामा हणमंत खोत .एकमेकांना भेटून जितके हरकले होते तितकेच महिपा मामा, व्ही.डी .पाटील यांच्या देवाघरी जाण्यामुळे अत्यंत दुखी कष्टी झाले होते .
गोडाऊन मध्ये भरणारी ती शाळा ,ते छोटेसे अंगण,तो कलकलाट या आठवणींनी ते सगळे भारावून गेले होते .त्यावेळच्या पाच पैकी ३ विद्यार्थिनी देखील उपस्थित होत्या .
हा हृद्य सोहळ्यास जिलेबीच्या जेवणाने गोडवा आणला .
निलेवाडीच्या शैक्षणिक वाटचालीत या सोहळ्याची ही आठवण पताका होऊन फडकत राहील. पुन्हा भेटण्याचा निर्णय घेऊन हा सोहळा सम्पन्न झाला यावेळी त्यांना शिकवणारे शिक्षक ,शिपाई ,1975 च्या बॅच चे विध्यर्थी व विधार्थिनी उपस्तीत होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment