Home पश्चिम महाराष्ट्र पुणे बेंगलोर महामार्गावरील किणी गावात दोन गव्यांचे दर्शन

पुणे बेंगलोर महामार्गावरील किणी गावात दोन गव्यांचे दर्शन

99
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे बेंगलोर महामार्गावरील किणी गावात दोन गव्यांचे दर्शन

किणी येथील अजित नेमगोंडा पाटील यांच्या घरापाठीमागील रिकाम्या जागेत पहाटे गव्यानी चिंचेच्या झाडाखाली दर्शन दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातील घुणकी ता. हातकणंगले तालुक्यात पुणे बेंगलोर हायवेशेजारी असलेले किणी येथे वस्तीत आज पहाटे दोन गव्यांनी दर्शन दिल्याने किणी, घुणकी, वाठार,तळसंदे , पारगाव परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी येथे अजित नेमगोंडा पाटील यांची घरापाठीमागील बाजूस जुन्या हायवेलगत रिकामी जागा आहे. तेथे चिंचेच झाड व शेजारी छोटा आड आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास दोन गवे नवीन व जुना हायवे पार करून किसान पाणी पुरवठ्यानजीकच्या ऊस शेतीतून आले. दरम्यान किणी येथील संजय चाळके हे पुण्याहून गावी परत आले असताना त्यांच्या मोटारी समोरुन दोन्ही गवेअजित पाटील यांच्या जागेत गेले. एखाद्या शेतकऱ्यांची जनावरे असावीत या भावनेतून श्री. चाळके यांनी शेजारच्या नागरिकांना माहिती दिली. पण ते गवे असल्याचे निदर्शनास आले.
चिंचेच्या झाडाखाली काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ज्या मार्गाने गवे आले त्याच मार्गाने ऊस तोडणी झालेल्या शेतातून तळसंदे गावच्या दिशेने गेल्याचे नागरीकांनी सांगितले.
दरम्यान वनविभागाच्या अधिका-यांना माहिती देण्यात आली. त्यांनी चौकशी सुरू केली आहे.
नरंदे वनविभागाचे वनरक्षक ईश्वर जाधव, वनसेवक पी.एन.खाडे यांनी पाहणी केली.गव्यांचा भ्रमण काळ असल्याने ते एका ठिकाणी थांबत नाही. शेतकऱ्यांनी शेतात जाताना दोनहून अधिक शेतकऱ्यांनी काठी आणि रात्री बँटरी घेऊन जावे. गवे निघून जातात. त्यांना हुसकावून लावू नये.ते बिथरण्याची शक्यता असते. त्यामुळे सतर्क रहावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.
तसेच सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. ऊस तोडणी मजूर वाहन रात्री आल्यानंतर ऊस वाहन भरण्यासाठी शेतात जातात. तसेच भारनियमनामुळे आठवड्यातील काही दिवस शेतातील विजपुरवठा रात्री सुरू असतो.पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात असतात.
मागीलवर्षी देखील पाडळी, मनपाडळे, पारगांव मधे गव्यांनी मुक्काम केला होता
पाडळी, मनपाडळे, पारगाव परीसरात गव्यांचा काही दिवस मुक्काम होता. हे गवे सादळे-मादळे परीसरतील जंगलातून आले असल्याचे नागरिकांनी सांगितले .
दरम्यान वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या पुणे बेंगलोर महामार्गालगत किणी येथे अचानक गवे दिसल्याने परिसरातील नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे .

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous article45 वर्षांनी भरली माजी. विध्यार्थांची शाळा
Next articleवंचित बहुजन आघाडी तालुका कार्यकारणी जाहीर…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here