Home राजकीय भाजपच्या टिकेला काँग्रेसचं प्रतिउत्तर

भाजपच्या टिकेला काँग्रेसचं प्रतिउत्तर

98
0

राजेंद्र पाटील राऊत

भाजपच्या टिकेला काँग्रेसचं प्रतिउत्तर

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारी राजकीय संघटना म्हणजे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस,
काँग्रेसने आज १३६वा स्थापनादिन साजरा केला. या कार्यक्रमाला पक्षातील संघटनात्मक आणि नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर पत्र लिहिणाऱ्या नाराज नेत्यांच्या उपस्थितीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. मात्र, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीची चर्चाच अधिक रंगली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्यावरून भाजपने टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी हे सध्या इटलीतल्या मिलानमध्ये
आपल्या आजीची भेट घेण्यासाठी गेले आहेत. या आधीही राहुल यांच्या विदेश दौऱ्यावरून सोशल मीडियावरही जोरदार टीका करण्यात आली होती. आता या टीकेला काँग्रेसने उत्तर दिलं आहे. राहुल हे आपल्या आजीला भेटायला गेले यात गैर काय आहे असा सवाल काँग्रेसने केला आहे. भाजप अतिशय खालच्या स्तराचं राजकारण करत असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी केली आहे.
काँग्रेसने सोमवारी आपला १३६ वा वर्धापन दिन साजरा केला आहे.याच कार्यक्रमाला राहुल गांधी नसल्याने चर्चेत भरच पडली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, राहुल गांधी हे विदेश दौऱ्यावर आहेत. लवकरच ते परतणार आहेत. प्रत्येकाला वयक्तित दौऱ्यावर जाण्याचा अधिकार आहे.
स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केरत कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. देश हितासाठी आवाज उठवण्यास काँग्रेस कायम अग्रेसर राहिली आहे. सत्य आणि समानतेसाठी आमचा आवाज कायम बुलंद असेल याची आम्ही ग्वाही देतो असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleनिवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू , अकलूज ग्रामस्थांचा इशारा
Next articleकाळाचौकी येथे श्रद्धा हाऊसिंग सोसायटी तर्फे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धे संपन्न झाली 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here