Home युवा मराठा विशेष कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती

कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती

109
0

🛑 कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 9 जून : ⭕खासगी व स्वायत्त कॉलेजांबरोबरच मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमधील प्रशासनाकडून पुढील वर्षाचे शैक्षणिक शुल्क तातडीने भरण्याची सक्ती विद्यार्थी व पालकांवर करण्यात येत आहे. त्यामुळे ही सक्ती थांबवण्यात यावी, तसेच कॉलेजांनी शैक्षणिक शुल्कामध्ये वाढ करू नयेत, असे आदेश विद्यापीठाने द्यावेत, अशी मागणी छात्रभारती संघटनेने कुलगुरूंकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाच्या कालावधीत अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. तर काहींना पूर्ण पगार मिळत नाहीत. यामुळे कुटुंबाचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. या परिस्थितीत मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांनी पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश शुल्क व इतर शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी कॉलेजांमध्ये नोटीस लावल्या आहेत. तसेच हे शुल्क तातडीने भरण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. अनेक विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत शुल्क भरणे शक्य नसल्यामुळे विद्यार्थी प्रचंड चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप टळण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा अशी मागणी रोहित ढाले यांनी पत्राद्वारे कुलगुरुंकडे केली आहे.

शुल्क भरण्याची सक्ती टाळण्याबरोबरच छात्रभारतीने कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रामध्ये कॉलेजांनी विद्यार्थ्यांना तात्काळ पैसे भरण्याची सक्ती करू नये, विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्य नसल्यास त्यांची प्रवेशादरम्यान अडवणूक न करता प्रवेश द्यावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क ४ ते ५ टप्प्यात भरण्याची मुभा द्यावी आणि कुठलेही शुल्क वाढवू नये व शुल्कामध्ये सवलत द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत.⭕

Previous articleअखेर म्हातोबादरा, सुतारदरा परिसरातील बॅरिकेड्स हटविले
Next articleमेट्रो २ ब मध्ये युरोपियन कंपनीची गुंतवणुकीची इच्छा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here