• Home
  • अखेर म्हातोबादरा, सुतारदरा परिसरातील बॅरिकेड्स हटविले

अखेर म्हातोबादरा, सुतारदरा परिसरातील बॅरिकेड्स हटविले

🛑अखेर म्हातोबादरा, सुतारदरा परिसरातील बॅरिकेड्स हटविले🛑
✍️पुणे (विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ नागरिकांच्यासंतप्त मागणीला लोकप्रतिनिधींची साथ लाभल्याने अखेर कंटेन्मेंट भाग वगळता इतर भागातील बॅरिकेडस काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

कोथरुड (पुणे) :कोथरुडमधील म्हातोबादरा, सुतारदरा, जयभवानीनगर, किष्किंधानगर या भागात कोरोना बाधित रुग्ण नसताना या वस्ती भागाला जोडणारे रस्ते बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्य संतापाची भावना होती. त्यातच जयभवानीनगरमध्ये एका आजींचा मृतदेह बाहेर काढायला रस्ता बंद असल्याने त्रास झाल्याने नागरिकांनी पत्रा तोडत रस्ता मोकळा केला. नागरिकांच्यासंतप्त मागणीला लोकप्रतिनिधींची साथ लाभल्याने अखेर कंटेन्मेंट भाग वगळता इतर भागातील बॅरिकेडस काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
कोथरुडमध्ये शास्रीनगर मधील पोस्टमन कॉलनी, पीएमसी कॉलनी, पौडरस्त्यावरील राहुल कॉम्प्लेक्स, केळेवाडीमधील गणपती मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर परिसर हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. या भागांमध्ये कंटेन्मेंटचे नियम लागू होतील. जयभवानीनगर मधील रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता हा भाग कंटेन्मेंट ठेवायची गरज नसल्याचे कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी सांगितले.
नगरसेवक दिपक मानकर यांनी सांगितले की, गेली अडीच महिन्याहून अधिक काळ लोक बंदिस्त अवस्थेत आहेत. त्यांना पोटापाण्यासाठी कामाला जाण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण नाहीत त्याभागातील लोकांच्या वाटा बंद करणे योग्य नाही. समाज सुरक्षेचे नियम पाळत लोकांना कामासाठी बाहेर जाता येईल अशी व्यवस्था व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे. नगरसेविका वैशाली मराठे, राजेंद्र मराठे, जितेश दामोदरे, तात्या कसबे, हरीभाऊ सणस, जयवंत दहिभाते, हनुमंत मोहोळ आदींनी सहाय्यक आयुक्त कदम यांना भेटून नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन दिले.⭕

anews Banner

Leave A Comment