Home Breaking News माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की; तिघांना अटक

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की; तिघांना अटक

97
0

🛑 माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की; तिघांना अटक 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ श्वानाला फेरफटका मारण्यासाठी घेऊन निघालेल्या ज्येष्ठ नागरिकाबरोबर वाद घालणार्‍या मद्यपी टोळक्याला जाब विचारणार्‍या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या सुनेला टोळक्याने धमकावले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
अमर सयाजी बनसोडे (वय-26), विनोद सुरेश गेंदे (वय-26), रोहिदास उर्फ तेजस राजेंद्र कांबळे (वय-19, तिघे रा. गणंजय सोसायटी, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मिथून हरगुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पसार आहे.
याप्रकरणी एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींविरोधात धमकावणे, मारहाण करणे तसेच विनयभंग अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार महिला एका खासगी कंपनीत मनुष्यबळ व्यवस्थापन विभागात अधिकारी आहे. त्यांचे सासरे शनिवारी (6 जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सहजानंद सोसायटीतील मोकळ्या रस्त्यावर पाळीव श्वानाला घेऊन निघाले होते. त्यावेळी आरोपी बनसोडे, गेंदे, कांबळे, हरगुडे मोकळ्या जागेत मद्यापान करत होते. तक्रारदार महिलेचे सासरे तेथून श्वानाला घेऊन जात असताना मद्याच्या नशेत असलेल्या आरोपींनी त्यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केला.
श्वान आमच्या अंगावर सोडतो का? अशी विचारणा करून त्यांना काचेची बाटली, दगड फेकून मारला. त्यानंतर ते पळत सोसायटीच्या आवारात आले. तक्रारदार महिला आणि राहुल कोल्हे, विलास कोल्हे यांनी टोळक्याकडे विचारणा केली. तक्रारदार महिलेला आरोपींनी धक्काबुक्की केली. तेथून काही अंतरावर माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा बंगला आहे. रस्त्यावर सुरू असलेला आरडाओरडा ऐकून त्या तत्काळ तेथे गेल्या. अरेरावी करणार्‍या आरोपींना कोल्हे तसेच कुलकर्णी यांनी पकडले. झटापटीत कुलकर्णी यांच्या हाताची दोन बोटे फ्रॅक्चर झाली. त्यानंतर तक्रारदार महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करत आहेत.⭕

Previous articleयासाठी नक्किच खा मोड आलेली कडधान्ये
Next articleअखेर म्हातोबादरा, सुतारदरा परिसरातील बॅरिकेड्स हटविले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here