Home माझं गाव माझं गा-हाणं मुंबई – आग्रा महामार्गावर उमराणे जवळ तवेरा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात ;...

मुंबई – आग्रा महामार्गावर उमराणे जवळ तवेरा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात ; तीन जणांचा मृत्यू

125
0

राजेंद्र पाटील राऊत

मुंबई – आग्रा महामार्गावर उमराणे जवळ तवेरा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात ; तीन जणांचा मृत्यू

देवळा,(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

उमरानेजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाच उपचारादरम्यान असे 3 जणांचा मृत्यू झाला. सध्या दाट धुक्यामुळे नाशिक जिल्ह्यात अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याचं बोललं जात आहे.

दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात इतका भीषण आहे की कारचा चक्काचूर झाला आहे.

अपघातग्रस्त कार मालेगावकडून नाशिकडे जात होती.

देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी, 21 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास उमराणे गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या दिशेने जात असलेली तवेरा कार (एम एच 15 सी एम 7712) हिने ट्रक (एमएच 43 इ 1806 ला) मागून जोरदार धडक दिली.

या भीषण अपघात तवेरा मधील दोन जण जागेवरच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतक दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, अद्याप देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Previous articleशिष्यवृत्ती व स्वाधार योजनेस प्रारंभ
Next articleडेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडगांव शहरात औषध फवारणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here