Home मराठवाडा औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी ‍केंद्रीय पथक समितीतील...

औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी ‍केंद्रीय पथक समितीतील सदस्यांनी शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

143
0

राजेंद्र पाटील राऊत

औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

‍केंद्रीय पथक समितीतील सदस्यांनी शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद
(युवा मराठा न्युज नेटवर्क)
औरंगाबाद, दि. २२ डिसेंबर : – औरंगाबाद तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील गाजीपूर, निलजगाव, शेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, जाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या थेट बांधावर जाऊन केंद्रीय पथक प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर.बी.कौल यांनी आज पाहणी करून संवाद साधला. अति पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत दुःख व्यक्त करत शासनाची लवकरच मदत मिळेल, असे आश्वासन शेतकऱ्यांना केंद्रीय पथकाच्या समितीने दिले.

पाहणी दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

मुरमी येथील संजय म्हस्के यांच्या शेतातील ज्वारी, मकाच्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांनी सदस्यांना दिली. ढोरेगाव येथील अहेमद जाफर शेख यांनी सव्वा एकर मका पिकाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. तसेच धर्म बेडवाल यांनीही दोन एकरातील कापसाचे अति पावसाने नुकसान झाले आहे. जाखमाथा येथे सदानंद थोरात यांच्या दोन एकर शेतातील अद्रक खराब झाली असल्याने, बाळासाहेब जाधव यांच्या शेतातील बाजरी, वरखेड येथे विकास उबाळे यांच्या 4 एकर क्षेत्रातील मका आणि दोन एकरातील कापूस पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. गंता आणि श्री. कौल यांनी ‘तुमच्या पिकांची पाहणी केली आहे, पंचनामा झाला आहे, झालेल्या नुकसानीची पाहणीही केली आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे मदतही मिळेल’ असे शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर वरखेड येथील पाणंद रस्त्याची पाहणी आणि गौतम कांबळे यांच्या शेतातील कांदा लागवाडीचीही पाहणी त्यांनी केली.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी पथकाच्या पाहणीबाबत सांगताना पथकाने जिल्हातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे, जास्त पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी करता आली नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीची योग्य तपासणी पथकातील समिती सदस्यांनी केली आहे, त्यामुळे जिल्ह्याला योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांशीही संवाद

औरंगाबाद तालुक्यातील निपाणी येथे सुनील काला, नंदू भालेकर, संदीप दुदल, दिलीप भालेकर, सखाराम पुंगळे, लहू भालेकर, पिंपळगाव पांढरी येथे विपिन कासलीवाल, विठ्ठल बहुरे, गाजीपूर येथे रामभाऊ राहतवाडे, निलजगाव येथे मच्छिंद्र मोगल आणि शेकटा येथे हरिश्चंद्र भवर यांच्याशी देखील केंद्रीय पथक प्रमुख श्री. गंता आणि श्री. कौल यांनी संवाद साधत नुकसानीची पीक पाहणी केली.

Previous articleदुप्पट मिळतील पैसे; काय आहे योजना Post Officeच्या या स्किममध्ये गुंतवणूक केल्यास.
Next articleमुखेड शहरात शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here