राजेंद्र पाटील राऊत
अवैध धंदे बंद करण्यासाठी रिपब्लिकन सेना आंदोलन करणार
संग्राम पाटील तांदळीकर शहर प्रतिनिधी मुखेड युवा मराठा न्युज नेटवर्क
मुखेड शहरातील अवैध धंदे जोराने चालू आहे देशात कोरोनाचे थैमान असताना सरकार त्यावर बेड वाढवता ऑक्सिजन पुरवठा सुरळीत न करता गोरगरीब लोकांच्या पोटावर माती टाकून लोक लाॅकडाऊन करून गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आणली हाताला काम नाही छोटे छोटे उद्योग करणारे व्यापारी आहेत काम नसल्याने गरीब हवालदिल झाला आहे कुठे छोटे दुकान उघडलं तर पण त्याला प्रशासन दंड वसूल केला जातो मात्र मुखेड शहरात सर्रासपणे अवैध धंदे जोमाने चालू आहेत शिंदी दारू मटका तसेच मोठ्या प्रमाणात सट्टा सुद्धा चालू आहे याकडे मात्र पोलिस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हे तात्काळ बंद करण्यात यावी या मार्गाने निवेदन मा अनिल शिरसे रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड यांनी मा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देऊन अवैध धंदे तात्काळ बंद न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहसील कार्यालय व पोलिस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे