• Home
  • दुप्पट मिळतील पैसे; काय आहे योजना Post Officeच्या या स्किममध्ये गुंतवणूक केल्यास.

दुप्पट मिळतील पैसे; काय आहे योजना Post Officeच्या या स्किममध्ये गुंतवणूक केल्यास.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201222-WA0006.jpg

दुप्पट मिळतील पैसे; काय आहे योजना Post Officeच्या या स्किममध्ये गुंतवणूक केल्यास.

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 22 डिसेंबर : कोरोना काळात जगभरातील अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना, गुंतवणूक करताना अतिशय विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत कोणतीही जोखीम उचलू शकत नसल्याचं गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे. परंतु पोस्ट ऑफिसची एक योजना अशा परिस्थितीत चांगली, सुरक्षित गुंतवणूक ठरू शकते. पोस्ट ऑफिसची एक अशी स्किम आहे, ज्यात पैसे दुप्पट मिळतात. तसंच या स्किममध्ये कोणत्याही प्रकारची जोखीमही नाही.

➡️ काय आहे स्किम :-

किसान विकास पत्र स्किम (Kisan vikas Patra – KVP Scheme) असं या योजनेचं नाव आहे. ही भारत सरकारकडून जारी करण्यात आलेली वन टाईम इन्वेस्टमेंट स्किम आहे. ही योजना सर्व पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये उपलब्ध आहे. किसान विकास पत्र या योजनेत गुंतवणूकदारांना मॅच्युरिटी पीरियडनंतर गुंतवलेली रक्कम दुप्पट मिळते. यात कमीत-कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. अधिकाधिक गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. ही योजना विशेषत: शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटनुसार, या स्किमचा मॅच्युरिटी पीरियड 124 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिने आहे.

➡️ किती मिळेल व्याज :-

किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 124 महिन्यांनी रक्कम डबल होईल. 30 सप्टेंबरपर्यंत याचा इंट्रेस्ट रेट 6.9 टक्के करण्यात आला आहे. एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास, मॅच्युरिटी पीरियडपर्यंत ही रक्कम दोन लाख रुपये होईल. जमा रकमेवर जो इंट्रेस्ट मिळतो, त्याचआधारे पैसे दुप्पट होतात.

➡️ कर्जाची सुविधा :-

कर्ज घेण्यासाठीही अतिशय कमी अटींवर लोन मिळेल. त्याशिवाय यात व्याजही कमी लागतं.

anews Banner

Leave A Comment