Home कोल्हापूर अविस्मरणीय नेतृत्व स्वर्गीय शिवाजीराव सालपे (आण्णा)

अविस्मरणीय नेतृत्व स्वर्गीय शिवाजीराव सालपे (आण्णा)

108
0

राजेंद्र पाटील राऊत

अविस्मरणीय नेतृत्व स्वर्गीय शिवाजीराव सालपे (आण्णा)

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील अविस्मरणीय युवानेतृत्व म्हणजे स्व. शिवाजीराव राजाराम सालपे (आण्णा).पेठ वडगांव शहरात ८५ च्या दशकात उदयास आलेले तरूण नेतृत्व म्हणजे आण्णा. तरूणाचे संघटन करून कोणत्याही प्रकारचे पाठबळ नसताना युवक क्रांती आघाडीच्या माध्यमातून समाजकार्या बरोबर वडगांव नगरपालिका राजकारणात शिवाजीराव सालपे आण्णा सक्रिय झाले.
लोकाभिमुख कामामुळे १९९१ साली वडगाव नगरपालिका निवडणुकीत यश संपादन केले. सन २००१ साली प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. आण्णा या नावाने ते वडगांव व परिसरात तसेच जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सर्वपरीचित नेतृत्व होते. सर्वसामान्य कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवून आण्णांनी वडगांव शहरात काम केले. रात्री-अपरात्री कार्यकर्त्याच्या हाकेला, अडचणीला आण्णा सदैव हजर असत. एखादा कार्यकर्ता काही दिवस भेटला नाही तर त्याची अगत्याने चौकशी करायचे आणि प्रसंगी घरापर्यंत जावून भेट घेत होते. कार्यकर्ता नाराज असेल तर त्याची नाराजगी काढण्याची एक विशेष शैली सालपे यांच्याकडे होती त्यामुळे कार्यकर्ता व आण्णा असे समीकरण पहावयास मिळत होते. त्यामुळेच कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली. भांडवलदार राजकारणापेक्षा प्रेम व आपुलकी आणि विश्वास या माध्यमातून आण्णानी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. राजकारणातील कोणताही निर्णय हा कार्यकर्त्याला विश्वासात घेवूनच ते घेत असत त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असत. राजकारणा पलीकडे जावून लोकांना मदत करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. पत्रकार मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी आण्णांचे राजकारणापलीकडचे मैत्रीचे संबंध होते.
कार्यकर्ता कितीही डोक्यात राग घेवून आला तरी आण्णा आपल्या शैलीने त्याच्या भावना जाणून घेवून त्याच्या प्रश्नाचे समाधान करत होते. सर्वसामान्य कार्यकर्ता हेच आण्णांचे शक्तिस्थान होते. आण्णांनी एखादा आदेश दिला की युवक क्रांती आघाडीचा कार्यकर्ता कोणतीही फिकीर न करता झोकून देवून काम करत होता. अण्णानी वडगांवच्या राजकारणाबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. आजदेखील जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिवाजीराव सालपे आण्णा यांचे नाव निघाल्याशिवाय रहात नाही. एक आधार आणि विश्वास म्हणून आण्णा यांचेकडे वडगांव शहरातील जनता, माता-भगिनी आपले प्रश्न घेवून जात असत आणि आण्णादेखील तितक्याच तळमळीने ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असत. असा हा लोकनेता २१ डिसेंबर २००९ साली आपल्यातून निघून गेलात याला आज अकरा वर्षे पूर्ण झाली. आजही युवक क्रांती महाआघाडीचा कार्यकर्ता त्यांच्या आठवणीशिवाय रहात नाही.
अशा या लोकनेत्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here