Home नांदेड करोनाबाधितांमध्ये बुरशीजन्य आजाराची लक्षणे,मधुमेहग्रस्तांना धोका तर मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्य़ांहून अधिक ;...

करोनाबाधितांमध्ये बुरशीजन्य आजाराची लक्षणे,मधुमेहग्रस्तांना धोका तर मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्य़ांहून अधिक ; ज्येष्ठ नेत्र तज्ञ तात्याराव लहाने

131
0

राजेंद्र पाटील राऊत

करोनाबाधितांमध्ये बुरशीजन्य आजाराची लक्षणे,मधुमेहग्रस्तांना धोका तर मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्य़ांहून अधिक ; ज्येष्ठ नेत्र तज्ञ तात्याराव लहाने

विशेष प्रतनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि. २१ – उत्तेजकांचा (स्टिरॉईड) वापर आणि अनियंत्रित मधुमेह यामुळे करोनाबाधितांमध्ये बुरशीजन्य आजाराची लक्षणे दिसू लागली आहेत.
यात प्रामुख्याने ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण ६० ते ७० टक्के असून, दृष्टी जाणे अथवा मृत्यू होण्याचा धोका संभवतो.
या आजाराची भीती न बाळगता वेळेत निदान आणि उपचार घेतल्यास धोका कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
अनियंत्रित मधुमेह, कर्करुग्ण, प्रत्यारोपण केलेले किंवा अन्य आजारांमुळे रोगप्रतिकारक शक्ती क्षीण असलेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
करोना साथीच्या काळात हा धोका अधिकपटीने वाढला आहे.
करोनाबाधितांच्या उपचारात प्रामुख्याने उत्तेजकांचा वापर केला जातो.
यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
परिणामी, अशा काही रुग्णांमध्ये विविध प्रकारच्या बुरशीजन्य संसर्गाची बाधा होत असल्याचे आढळले आहे.
पैकी बहुतांश रुग्णांना ‘म्युकरमायोकोसिस’ या संसर्गाची लागण होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे.
जे.जे. रुग्णालयात पाच ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण आढळले असून करोना संसर्गानंतर ६० हून अधिक दिवसांनी याची बाधा झाली आहे.
दोन रुग्णांमध्ये संसर्ग डोळ्यांतील रक्तपेशीपर्यंत पोहचला असून, यामुळे दृष्टी जाण्याचा धोका आहे.
या रुग्णांचे निदान उशिरा झाले.
करोनामुक्त रुग्णांच्या वरचेवर तपासण्या झाल्यास संसर्गाचे निदान लवकर होऊ शकते, असे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी अधोरेखित केले.
सर्वसाधारणपणे ‘म्युकरमायकोसिस’ अनियंत्रित मधुमेहींमध्ये आढळतो.

Previous articleअविस्मरणीय नेतृत्व स्वर्गीय शिवाजीराव सालपे (आण्णा)
Next articleअतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य यांना भोवणार !                         ग्रामंचायत निवडणूकीच्या रणधुमाळीत धसका !!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here