Home नांदेड देगलूर शहरात उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन…

देगलूर शहरात उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन…

102
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर शहरात उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर – देगलूर शहरात दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा च्या वतीने उपविभागीय अधिकारी देगलूर यांना निवेदन देण्यात आले. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा च्या वतीने देगलूर उपविभागीय अधिकारी यांना नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरात दलित मूकबधिर दिव्यांग मुलीवर घडलेल्या बलात्कार प्रकरणी नराधमांना अटक करून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शिवाजीराव कनकंठे भाजपाचे ज्येष्ठ नेते मंगल देशमुख आलुरकर नगरसेवक प्रशांत दासरवाड अनुसूचित जाति मोर्चा चे राजेंद्र मंडगीकर भाजपाचे ज्येष्ठ नेते चीलवरवार सर भाजपचे सरचिटणीस गंगाधर आऊलवार सर युवा मोर्चा शहर अध्यक्ष अशोक कांबळे जय वर्धन कांबळे सचिन कांबळे गणेश घाटे सतीश पोंतांगले राजू गायकवाड शहापूरकर मनोज वाघमारे सह भाजपाचे देगलूर चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमौजे आलूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना 64 व्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले अभिवादन..
Next articleअविस्मरणीय नेतृत्व स्वर्गीय शिवाजीराव सालपे (आण्णा)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here