• Home
 • शाळा तपासणी आदेश रद्द करावी, आमदार जयंत आसगावकर

शाळा तपासणी आदेश रद्द करावी, आमदार जयंत आसगावकर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201210-WA0000.jpg

 1. शाळा तपासणी आदेश रद्द करावी,
  आमदार जयंत आसगावकर

  कोल्हापूर : शासनाने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांबाबत फेरतपासणी करण्याचा आदेश रद्द करावा आणि या शाळांना अनुदान द्यावे अशी मागणी पुणे शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शपथविधी झाल्यानंतर पहिल्या दिवशीच आमदार आसगांवकर यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.
  निवेदनात म्हटले आहे की, शासनाने १ डिसेंबर ला प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांबाबत आदेश काढला आहे. यावर फेरविचार झाला पाहिजे. कारण, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या यांच्या शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार शाळांची तपासणी होऊन अनेक शाळा अनुदानास पात्र झालेल्या आहेत.
  मात्र या आदेशामुळे सर्व तुकड्यांची फेर तपासणी करण्याबाबत काढलेला आदेश योग्य वाटत नाही. तरी हा आदेश रद्द करावा व या सर्व शाळांना अनुदान देणेबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार प्रा.जयंत आसगावकर केली. यावेळी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

  युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment