Home कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेने २ लाख ३२हजार थकित पाणिपट्टी वसूल

कोल्हापूर महापालिकेने २ लाख ३२हजार थकित पाणिपट्टी वसूल

85
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर महापालिकेने २ लाख ३२हजार थकित पाणिपट्टी वसूल

कोल्हापूर​ ​: शहरातील मनिषानगर,
साळोखेपार्क, मंडलिक वसाहत परिसरात तसेच राजारामपुरी राजेंद्रनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा वसूली पथकांनी काल २ लाख ३२ हजार रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले​. ​
​ ​शहरातील मनिषानगर, साळोखेपार्क,​ ​मंडलिक वसाहत परिसरात तसेच राजारामपुरी राजेंद्रनगर परिसरातील महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा वसूली पथकाने १ लाख २२ हजार ६२५ रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले असल्याची माहिती शहर पाणी पुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख अमर बागल यांनी दिली.
याबरोबरच थकीत पाणी बिलासाठी या पथकाने या परिसरातील थकबाकीदारांची पाणी​ ४ कनेक्शन बंद केली आहेत.
ही कारवाई पाणी पुरवठा विभागाचे वसूली पथक प्रमुख अमर बागल, मिटर रिडर रणजित संकपाळ, किशोर यादव, संदीत कांबळे विश्वास कांबळे यांनी सहभाग घेतला.
​ ​याबरोरबच राजारामपुरी राजेंद्रनगर परिसरातील ​२ पाणी कनेक्शन खंडित करुन थकबाकीपैकी १​ ​लाख ९ हजार रुपयांची वसूली केली आहे. ही कारवाई मिटर रीडर रमेश मगदूम, संदीप माळी, बजरंग शिंगाडे आणि फिटर तानाजी माजगांवकर यांच्या पथकांने केली.​ ​थकीत पाणी बिलाच्या वसूलीसाठी यापुढेही विशेष पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याने नळ कनेक्शन धारकांनी आपले थकीत व चालूचे पाणी बिल तात्काळ भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाचे जल अभियंता नारायण भोसले यांनी केले आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous article1 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद राहणार जिल्हा प्रशासना कडून दिले आदेश..
Next articleदम असेल तर वीज तोडून दाखवाच, राजू शेट्टींचा इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here