• Home
  • 🛑 *वारजे भागातील रामनगर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी व आरोग्यप्रशिक्षण तसेच कोव्हीड टेस्ट सेंटर मध्ये मास्क वाटप.* 🛑

🛑 *वारजे भागातील रामनगर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी व आरोग्यप्रशिक्षण तसेच कोव्हीड टेस्ट सेंटर मध्ये मास्क वाटप.* 🛑

🛑 *वारजे भागातील रामनगर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी व आरोग्यप्रशिक्षण तसेच कोव्हीड टेस्ट सेंटर मध्ये मास्क वाटप.* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

वारजे / पुणे :⭕कोरोनाचे रुग्ण जसे दिवसेंदिवस वाढत आहेत तसेच त्यांचे बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहे. ही सकारात्मक बाब असली तरीही आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. यासाठी वारजे भागातील प्रत्येक कुटुंबीयांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमात सामील होणे आवश्यक.

आज वारजे मधील रामनगर परिसरात राहणाऱ्या बऱ्याच कुटुंबियांची आ आरोग्य तपासणी केली. यामध्ये टेम्प्रेचर तसेच ऑक्सिजन लेव्हल चेक केली. आणि प्रत्येक नागरिकाला आरोग्यप्रशिक्षण देखील देण्यात आले. रामनगर मधील नागरिकांनी देखील सजगता दाखवत याला चांगले सहकार्य केले.

कोव्हीड टेस्ट सेंटर ला देखील आज भेट देण्यात आली. यावेळी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मास्क देण्यात आले. आणि प्रत्येकाशी संवाद साधण्यात आला. तसेच कोणाला काहीही समस्या असल्यास निःसंकोचपणे संपर्क साधण्यास सांगितले.

आपल्याला देखील कोरोना संदर्भात कुठलीही मदत लागल्यास कृपया निःसंकोचपणे संपर्क साधा…

तुम्ही हाक द्या, मी साथ देईन…

पराग तानाजी ढेणे
98235 13131
लोकसेवा हाच ध्यास..!….⭕

anews Banner

Leave A Comment