• Home
  • *कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवार, 5 नोव्हेंबर रोजी भव्य ट्रॅक्‍टर रॅली*

*कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवार, 5 नोव्हेंबर रोजी भव्य ट्रॅक्‍टर रॅली*

*कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवार, 5 नोव्हेंबर रोजी भव्य ट्रॅक्‍टर रॅली*

*युवा मराठा न्यूज*

कोल्हापूर : केंद्र सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी भव्य ट्रॅक्‍टर रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या रॅलीची सुरुवात निर्माण चौकातून होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील मोदी सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयकं मंजूर करुन घेतली.
लोकशाही, संविधान आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून केंद्र सरकारने तीन शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत. या काळ्या कायद्याविरोधात कॉंग्रेस पक्ष देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. या विरोधात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाने देशव्यापी लढाई सुरू केली आहे.
रॅली गुरुवार दि. 05 नोव्हेंबर, रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता निर्माण चौकातून सुरुवात होणार असून याची सांगता दसरा चौक येथे होणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार, माजी आमदार, तालुकाध्यक्ष व विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी या रॅलीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी ट्रॅक्‍टरसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले आहे.” 

anews Banner

Leave A Comment