Home Breaking News *छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालय आजपासुन सुरू*

*छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालय आजपासुन सुरू*

226

*छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालय आजपासुन सुरू*

*युवा मराठा न्यूज*

कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालय गेल्या साडेसात महिन्यांपासून अन्य रुग्णांसाठी (नॉन कोव्हिड) बंद असलेली सेवा आता टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. बुधवारी मानसोपचार विभागाची ओपीडी सुरू झाली ,मात्र प्रमुख विभागाच्या ओपीडीला होणार्‍या गर्दीची प्रशासनाला चिंता आहे. त्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
कोरोना महामारी काळात सी.पी.आर. कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर सी.पी.आर.मध्ये केवळ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अन्य रुग्णांवर कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मात्र, गेल्या सात महिन्यांत रुग्णसंख्या आणि क्षमता यामुळे सेवा रुग्णालयावर प्रचंड ताण येत आहे.
सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दैनंदिन आणि उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे सी.पी.आर. कोरोना नसलेल्या अन्य रुग्णांसाठी सुरू करावे, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर नॉन कोव्हिड रुग्णांसाठी सी.पी.आर. सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने सी.पी.आर.चे सर्व विभाग सुरू केले जाणार आहेत. दूधगंगा इमारतीतील २०० खाटा कोरोना रुग्णांसाठी, तर उर्वरित २५० खाटा अन्य रुग्णांसाठी वापरल्या जाणार आहेत.
सी.पी.आर. प्रशासनाने मानसोपचार विभागाची ओपीडी सुरू केली आहे. उद्यापासून दंत विभागाचे त्यानंतर स्किन विभागाची ओपीडी सुरू केली जाणार आहे. येत्या काही दिवसात प्रसुती विभागही सुरू केला जाणार आहे.

मोहन शिंदे,
कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी .

Previous article*कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवार, 5 नोव्हेंबर रोजी भव्य ट्रॅक्‍टर रॅली*
Next article*दिवसभरात 201 रुग्ण कोरोनामुक्त* *आज अखेर 45 हजार 902 जणांना डिस्चार्ज*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.