मराठा आरक्षणाचा प्रश्न आता :- शरद पवारांच्या दरबारी
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
मुंबई :⭕राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात तीन पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन केले. तसेच आता त्यांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. यासाठी आम्ही लवकरच शरद पवार यांची भेट घेण्यात असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांनी सांगितले आहे.
शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे. त्यांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यापूर्वीही मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती. मात्र, तुर्तास शरद पवार मराठा आरक्षणासंदर्भात मोजके आणि सावधपणाने बोलण्यावर भर देत आहेत.
मात्र, आता मराठा क्रांती मोर्चाचे थेट त्यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.
त्यामुळे आता महाविकासआघाडीचे मार्गदर्शकअसलेले शरद पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घेणार आणि हा प्रश्न सुटणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे…..⭕